चंद्रपूर : पॉलिटेक्निकचा अंतिम वर्ष २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्राचा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळव्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्निकच्या मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी मनीष स्वान याने ९७.३१ टक्के गुण घेऊन महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान पटकावला. उल्लेखनीय सोमय्या पाॅलिटेक्निकचे सर्व ४७१ विद्यार्थी प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. १०० टक्के निकालाची परंपराही यंदाही कायम राखली आहे.
अंतिम वर्षातील ४७१ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यातही ५ विद्यार्थी ९५ टक्केपेक्षा अधिक गुणांसह, ६६ विद्यार्थी ९० टक्केपेक्षा अधिक गुणांसह, २०४ विद्यार्थी ८५ टक्केपेक्षा अधिक गुणांसह तर ३४३ विद्यार्थी ८० टक्केपेक्षा अधिक गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत सर्वोत्कृष्ट यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियूष आंबटकर, अंकिता आंबटकर, ए. प्राचार्य जमीर शेख, रजिस्टर बिसन यांच्या उपस्थितीत पार पडला.
बाॅक्स
विभागनिहाय गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी
या निकालामध्ये मेकॅनिकल विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी मनीष स्वान याने ९७.३१ टक्के गुण घेऊन महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान पटकावला. इलेट्रिकल विभागातून पियुष देवगडे ९५.७८ टक्के व जान्हवी दौरकर ९३.३१ टक्के, सिव्हिल विभागातून महेक सिध्दीकी ९५.३२ टक्के व आदित्य यादव ९३.०५ टक्के, माईनिंग विभागातून सौरभ श्रीवास्तव ९५.३० टक्के, काॅम्प्यूटर ॲण्ड इंजिनिअरिंग अंतिम वर्षाचा विद्यार्थी विश्वजित सरकार ९२.०० टक्के, इलेक्ट्रीक ॲण्ड टेलिकम्युनिकेशन अंतिम वर्षातील करनजित चड्डा ९३.७१ टक्के व कशीश बुडे ९३.१२ टक्के, माईनिंग विभागातून अंतिम वर्षातील दीपक खैरकर ८७.२२ टक्के व रितीक मोरे ८५.७४ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत.
कोट
सर्व विभागप्रमुख सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेव्दारे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट सुविधा, मार्गदर्शन, शिस्त, नियमित वर्ग, संस्थेव्दारे पुरविण्यात येणारे गुणवत्तापूर्ण साहित्य व मार्गदर्शकपूर्ण ग्रंथालय या सर्व बाबींचा उत्तम मेळ हेच या विद्यार्थ्यांना मिळालेल्या नेत्रदीपक यशाचे गमक आहे.
- पी. एस. आंबटकर, संस्थाध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर