शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
2
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
3
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
4
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
5
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
6
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
7
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
8
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
9
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
10
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
11
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
12
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
13
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
14
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
15
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
16
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
18
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
20
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

विद्यार्थ्यांनी अडविली एसटी बस

By admin | Published: September 20, 2016 12:44 AM

बसमध्ये बसायला जागा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांनी ...

शैक्षणिक नुकसान : दुसऱ्यांदा बस रोखलीगोवरी : बसमध्ये बसायला जागा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शालेय विद्यार्थी व गावकऱ्यांनी सोमवारी दुसऱ्यांदा राजुरा आगाराच्या एसटी बसची वाट अडविली व अतिरिक्त बस देण्याची मागणी केली. जोपर्यंत अतिरिक्त बस मिळणार नाही, तोपर्यंत बससमोरुन कोणीही हलणार नाही, असा पवित्रा विद्यार्थी व गावकऱ्यांनी घेतल्याने आधीच बसमध्ये बसलेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. गोवरी येथील बसस्थानकावर अतिरिक्त बसच्या मागणीसाठी दोन्ही बाजुकडील वाहतूक विद्यार्थी व गावकऱ्यांनी रोखून धरल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शासन कोट्यवधी रुपयाचा खर्च करते. मात्र तिच योजना निट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही तर त्या योजनेचे सार्थक होत नाही. अशीच स्थिती सध्या गोवरी, चिंचोली, माथरा, पोवनी येथील विद्यार्थ्यांची झाली आहे. राजुरा येथे शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी राजुरा येथे जातात. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रोज प्रवास करावा लागत असल्याने राजुरा आगाराने बस पासची सोय उपलब्ध करून दिली. मानव विकास मिशन अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी बस आहे. परंतु त्या बसमध्ये विद्यार्थ्यांऐवजी प्रवासी बसून राहत असल्याने समोरील बसस्टॉप वरील विद्यार्थ्यांना बसायाला जागा मिळत नाही. राजुरा-गोवरी-मार्डा हा ग्रामीण भागातील प्रवासासाठी लांबचा टप्पा आहे. एकदा बस सुटली की पुन्हा मिळत नाही. या उद्देशाने प्रवासीही बसमध्ये दाटी करतात. त्यामुळे बस पास असूनही विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही. विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षकि नुकसान लक्षात घेता गोवरीचे सरपंच सुनील उरकुडे यांनी वारंवार राजुरा आगार व्यवस्थापकाकडे अतिरिक्त बस देण्याची मागणी केली. पंधरा दिवसांपूर्वी बससाठी शालेय विद्यार्थ्यांनी असाच हंगाम केला होता. तेव्हा आठ दिवसात दुसरी अतिरिक्त बस देण्यात येईल, असे सांगण्यात आले व वेळ मारुन नेली. मात्र १५-२० दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही बस मिळण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने सोमवारी सकाळी गोवरीचे सरपंच सुनील उरकुडे, तंटामुक्त अध्यक्ष गोपीनाथ जमदाडे यांचे नेतृत्त्वात गावकरी व विद्यार्थ्यांनी अतिरिक्त बसची मागणी करीत तब्बल दीड तास वाहतूक रोखून धरली. जोपर्यंत दुसरी अतिरिक्त बस मिळत नाही तोपर्यंत वाहने जाऊ देणार नाही, असा पवित्रा गावकरी व विद्यार्थ्यांनी घेतला होता. त्यामुळे अनेकांना तातकळत रस्त्यावरच उभे राहावे लागले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आजही नाईलजाने घराकडे परतून जावे लागले. दररोज ५० हुन अधिक विद्यार्थ्यांना घरी राहावे लागत असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. (वार्ताहर)राजुरा-गोवरी- मार्डा या बसमध्ये आधीच प्रवासी बसून राहात असल्याने आम्हा विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही. बस पास असूनही बसअभावी आम्हाला नाईलाजाने बसस्टॉप वरुन घराकडे परत जावे लागते. त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे.- गितांजली पाचभाईविद्यार्थिनी, गोवरी