लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इतर मागास विद्यार्थ्यांची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती व वर्ग ५ ते १० वीच्या मुलींना देण्यात येत असलेली सावित्रीबाई शिष्यवृत्ती अद्यापही प्रलंबित आहे. परिणामी विद्यार्थ्यांना अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती लागू करण्याचे परिपत्रक २७ मे २०१९ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रातील इतर मागास प्रवर्गातील मुलांनी शिष्यवृत्ती अर्ज विहित नमुन्यात भरून मुख्याध्यापकांमार्फत समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. परंतु, विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळाली नाही. तसेच पाचवी ते दहावीमधील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थिंनींना सावित्रीबाई फुले योजनेतंर्गत देण्यात येणारी शिष्यवृत्ती अद्यापही प्रलंबित आहे. सत्र सुरु होवूनही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने अडचण जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्वरीत शिष्यवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात श्याम लेडे, रामराव हरडे, देवराव दिवसे, प्रदिप पावडे, राजू हिवंज आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 5:00 AM
इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती लागू करण्याचे परिपत्रक २७ मे २०१९ रोजी महाराष्ट्र शासनातर्फे काढण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रातील इतर मागास प्रवर्गातील मुलांनी शिष्यवृत्ती अर्ज विहित नमुन्यात भरून मुख्याध्यापकांमार्फत समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले. परंतु, विद्यार्थ्यांना अद्यापही शिष्यवृत्ती मिळाली नाही.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : प्रंलबित शिष्यवृत्ती देण्याची मागणी