जगदीश अग्रवाल यांचे मत : लोकमत बाल विकास मंच व विद्यानिकेतन स्कूलचा उपक्रमचंद्रपूर : विद्यार्थीच विद्यार्थ्यांचे करिअर घडवू शकतो. त्याच्या सर्व यशाला व अपयशाला दुसरा-तिसरा कोणीही जबाबदार नसून तो स्वत:च जबाबदार आहे, असे मत व्यक्तिमत्त्व विकासतज्ज्ञ जगदीश अग्रवाल यांनी व्यक्त केले. अभ्यासिका कार्यशाळा स्थानिक विद्यानिकेतन स्कूलमध्ये घेण्यात आली. यावेळी अग्रवाल बोलत होते. या कार्यशाळेत इयत्ता नववी, दहावीचे ४०० विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा, त्याची पद्धत, जास्त वेळ लक्षात कसे ठेवणे यावर मार्गदर्शन करण्यात आले. सोबत परीक्षा जवळ येत असल्याने पालकांनीसुद्धा आपल्या पाल्यासोबत कशी वर्तणूक करावी, त्यांच्यावर अपेक्षेचे ओझे देवू नये. त्यांना स्वत: करिअर निवडू द्या, अशा शब्दात त्यांनी मुलांना प्रोत्साहित केले. त्याचा विद्यार्थ्यांच्या बौद्धिकतेवर बराच परिणाम झाला. कार्यशाळा संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी वेगळी मानसिकता घेऊन बाहेर पडतो. आपणही काहीतरी करू शकतो, असा आत्मविश्वास प्रत्येक विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. या कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून विद्यानिकेतन सी.बी.एस.ई. स्कूलच्या मुख्याध्यापिका सपना पित्तलवार, विद्यानिकेतन स्टेट बोर्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका राजश्री गोहकार, योगिता देशमुख तसेच मंजू शिरवणेकर, सीमा नगराळे, सुवर्णा बन्सोड, मीना मॅडम आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन सुनंदा तिवारी यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा इव्हेटप्रमुख अमोल कडूकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यानिकेतन स्कूलचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
विद्यार्थीच विद्यार्थ्यांचे करिअर घडवू शकतो
By admin | Published: February 04, 2017 12:38 AM