लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका प्राध्यापकाने सोमवारी विद्यार्थ्याला मारहाण केली. मारहाणीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी मंगळवारी प्राध्यापकावर कारवाई करावी, या मागणीला घेऊन ठिय्या आंदोलन केले. तब्बल दोन तासपर्यंत विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या गेटसमोर आंदोलन करीत नारेबाजी केली.दरम्यान, प्राचार्यांनी विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेत चौकशी करण्याचे व संबंधित प्राध्यापकावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलनमागे घेतले. विशेष म्हणजे, सोमवारी मारहाणीच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी प्राचार्य व रामनगर पोलिसांना याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी अदखपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजमधील गणेश नावाचा एक विद्यार्थी ग्रंथालयाकडे जात असताना येथील प्रा. राजेश पेचे यांनी त्याला कोणत्या विभागात असल्याचे विचारले. त्यानंतर त्या विद्यार्थ्याला शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी प्रथम प्राचार्याना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती.मारहाणप्रकरणी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार चौकशी समिती नेमणार होतो. पण विद्यार्थ्यांचे त्यावर समाधान झाले नाही. अखेर चौकशी समिती नेमण्यासाठी नागपूर येथील जार्इंट डायरेक्टर यांना पत्र पाठविणार आहे. विद्यार्थ्यांनी पोलिसातही तक्रार दिलेली आहे. यापूर्वीही सदर प्राध्यापक राजेश पेचे यांची एका प्रकरणात चौकशी केली होती.- जी.जी. भुतडा,प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर
शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकाविरुद्ध विद्यार्थ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:28 PM
शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजच्या एका प्राध्यापकाने सोमवारी विद्यार्थ्याला मारहाण केली. मारहाणीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी मंगळवारी प्राध्यापकावर कारवाई करावी, या मागणीला घेऊन ठिय्या आंदोलन केले. तब्बल दोन तासपर्यंत विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या गेटसमोर आंदोलन करीत नारेबाजी केली.
ठळक मुद्देप्राचार्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे : रामनगर ठाण्यातही तक्रार