परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच स्थानिक स्तरावर राहून उच्च शिक्षण घेता यावे, याकरिता आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करण्यात आली. मात्र अधिकारी व कर्मचाºयांच्या दुर्लक्षितपणामुळे वसतिगृहात विविध समस्यांचे निवारण करण्यात येत नाही. चंद्रपुरातील शासकीय वसतिगृह क्रमांक २ मध्ये तर विद्यार्थ्यांची अक्षरश: होरपळ सुरु आहे.आदिवासी समाजाचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन प्रगतीपदावर पोहचावा, यासाठी समाजकल्याण विभागाद्वारे तसेच आदिवासी विभागातर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी शासकीय निवासी वसतिगृहाची सोय करण्यात आली. त्यानुसार चंद्रपूर येथे सन २०१० ला तुकूम परिसरात शासकीय वसतिगृह क्रमांक २ सुरु करण्यात आले. या वसतिगृहामध्ये २५० विद्यार्थी प्रवेश क्षमता असून गुणवत्तेच्या आधारावर वसतिगृहात बारावी ते पदवीधारक, तसेच विविध पदविकाचे शिक्षण घेणारे १०६ विद्यार्थी वास्तव्यास आहेत. मात्र वसतिगृहात अनेक समस्या असल्याने विद्यार्थ्यांची या वसतिगृहात होरपळ होत आहे. त्यांच्या समस्यांकडे संबंधित अधिकारीवर्गांचे लक्ष जावे, यासाठी या विद्यार्थ्यांना चक्क उपोषणाचा मार्ग पत्कारावा लागला. शनिवारपासून विद्यार्थ्यांनी उपोषण सुरु केले आहे.बेडअभावी विद्यार्थी झोपतात खालीवसतिगृहातील विद्यार्थ्यांंना झोपण्यासाठी बेडची व्यवस्था शासनाकडून करण्यात येते. मात्र या वसतिगृहातील एकाच रुममध्ये १५ ते २० विद्यार्थ्यांची सोय केली आहे. मात्र त्याठिकाणी मोजक्याच खाटा असल्यामुळे विद्यार्थ्यांना फरशीवर झोपावे लागत आहे.तुटलेल्या ताटात जेवणविद्यार्थ्यांना तुटलेल्या ताटात जेवण दिले जाते. त्यामुळे बहुतेकदा जेवण करताना अर्धे अन्न खाली पडत असल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. जेवायलाही धड ताट दिले जात नाही, तिथे इतर व्यवस्था कशी असेल, याची जाणीव येते. अधिकाºयांचे याकडे कायम दुर्लक्ष आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तुटलेल्या ताटात जेवण करावे लागत आहे.स्वच्छतागृहात साचले पाणीयेथील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहातील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे स्वच्छतागृहात पाणी साचले आहे. त्यामुळे या स्वच्छतागृहातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. याबाबत विद्यार्थ्यांनी अनेकदा तक्रार करुनही कोणत्याही अधिकाºयांनी लक्ष दिले नाही. परिणामी विद्यार्थ्यांना तशाच अवस्थेत स्वच्छतागृहातील कामे करावी लागत आहे.परिसरात कचºयाचे साम्राज्यवसतिगृहाच्या परिसरातील स्वच्छता करण्यात येत नसल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे तयार झाली आहेत. मात्र त्याची स्वच्छता करण्यात आली नाही. त्यामुळे साप, विंचू यासारखे सरपटणारे प्राणी निघत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका होण्याची शक्यता आहे.२५० विद्यार्थ्यांना एकच वॉटरकूलरशासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी एकच वॉटरकूलरची व्यवस्था आहे. ते वॉटरकूलरसुद्धा कधी सुरु तर कधी बंद स्थितीत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होत असते.
वसतिगृहात विद्यार्थ्यांची होरपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:44 AM
आदिवासींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच स्थानिक स्तरावर राहून उच्च शिक्षण घेता यावे, याकरिता आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करण्यात आली.
ठळक मुद्देकेविलवाणी अवस्था : शिक्षणासाठी घरदार सोडून आलेल्या विद्यार्थ्यांचा समस्यांशी सामना