शेतकरी आक्रमक
कुचना : एका बैठकीत आपली बाजू मांडणाऱ्या एका शेतकऱ्याला मधेच थांबवून अवमान केल्याप्रकरणी अखेर उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसमक्ष माफी मागितली. यापुढे शेतकऱ्यांना चुकीची वागणूक देणार नसल्याची ग्वाही दिली. ही घटना मंगळवारी वरोरा उपविभागीय कार्यालयात घडली.
दि.१८ जूनला वरोरा येथे रेल्वे भूसंपादन विषयाबाबत शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. भद्रावती तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी या बैठकीला उपस्थित होते. तसेच वरोराचे उपविभागीय अधिकारी, रेल्वे अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी हजर होते. चर्चेदरम्यान प्रत्येक व्यक्तीला संविधानानुसार मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यानुसार एक शेतकरी आपली बाजू मांडत असताना उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याला मधेच थांबवून तुझ्यासारखे भुक्कड शेतकरी आता मला शिकविणार का? असा शब्दप्रयोग केला. यामुळे आपल्या भावना दुखावल्याची लेखी तक्रार संबंधित शेतकऱ्याने थेट पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे करून जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. या विरोधात किसानपुत्र शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप करून शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. अखेर आज वरोरा उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसमक्ष संबंधित शेतकऱ्याची माफी मागितली. या प्रसंगाचे किसानपुत्र शेतकरी संघटनेचे नरेंद्र जीवतोडे, सभापती प्रवीण ठेंगणे, प्रकाश निब्रड, संदीप झाडे, नंदोरीचे शेतकरी महादेव तिखट, बंडू बलकी व अन्य शेतकरी साक्षदार होते. यावेळी लवकरच रेल्वे आणि वणी-वरोरा महामार्ग जमीन खरेदीत झालेला गोंधळ दूर करून प्रत्येक शेतकऱ्यांना यथायोग्य न्याय देण्याचा शब्दही उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला.
===Photopath===
220621\img_20210622_144555.jpg
===Caption===
शेतकऱ्याचे तक्रार अर्ज