राजू गेडाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल: जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने एक कोटी ६५ लाख रूपये खर्च करुन बांधलेल्या येथील उपजिल्हा रुग्णालयावर स्त्री रोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाल्याने वर्षभरात ९४ सिझेरियन डिलव्हरी यशस्वीरित्या पूर्ण करणे शक्य होऊ शकल्या. कठीण परिस्थिती चंद्रपूरला रेफर करण्यासाठी होणारी रूग्णांच्या नातेवाईकांची धावपळ झाली. मात्र उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त पदाचे ग्रहण सुटले नाही. ही पदे तातडीने भरल्यास रुग्णांना उपचारासाठी अन्यत्र जाण्याची गरज उरणार नाही.मूल शहर व तालुक्याची लोकसंख्या जवळपास सव्वा लाखांपेक्षा अधिक आहे. येथील उपजिल्हा रूग्णालयात बाह्य व आंतर रूग्ण मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांसह एकच वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद भरण्यात आले आहे. स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. मनीषा रेवतकर या चिमूर उपजिल्हा रूग्णालयातून प्रतिनिधीयुक्तीवर आल्या आहेत. त्यांनी वर्षभरात केलेल्या ९४ सिझेरियन डिलव्हरी यशस्वीरित्या केल्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात सिझेरियन डिलव्हरी प्रथमच झाल्या आहेत. आतापर्यंत ‘रेफर टू चंद्रपूर’ असा प्रकार सुरू होता. मात्र डॉ. रेवतकर यांच्यामुळे ९४ कुटुंबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. त्यामुळे त्यांची नियुक्ती मूल येथे कायमस्वरुपी करण्याची मागणी जनतेद्वारा केली जात आहे. वैद्यकीय अधिकारी उज्ज्वल इंदूरकर हेच एकमेव वैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी कार्यरत आहेत.डॉ. मेश्राम यांची कंत्राट नियुक्ती आहे. तीदेखील एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात रिक्त पदांमुळे मोठी अडचण निर्माण होणार आहे. रूग्णांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता बाह्य व आंतररुग्ण सांभाळण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज आहे यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरणे गरजेचे आहे. रुग्णालयात अधिपारिचारिकांची पदे वाढविल्यास महिला रूग्णांवर उपचार करणे पुन्हा सोईचे होईल.शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्णपरिचारिकेचे १२ पैकी ६ पदे भरण्यात आली. आरोग्य सेवेवरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून तर पारिचारिकांची पदे तातडीने भरल्यास रुग्णांना दिलासा मिळू शकतो. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाला १४७ चे उद्दिष्ट होते. १८५ शस्त्रक्रिया झाला. ५०० च्या वर नार्मल डिलव्हरी करण्यात आल्या. उपजिल्हा रूग्णालयात औषधांचा साठा उपलब्ध आहे. पण रिक्त पदे भरल्यास अडचण कायमची दूर होऊ शकते.रुग्णांना योग्य सेवा देण्याकडे विशेष लक्ष आहे. रूग्णालयातील सर्व सुविधा अद्ययावत करण्याचा प्रयत्न सुरु असून काही दिवसात रुग्णालयाचे रुप पालटल्याचे दिसेल. रुग्ण ताटकळत उभे राहू नये, यासाठी टोकन सिस्टीम लावली जाणार आहे. वैद्यकीय अधिकाºयांची पदे भरल्यास आरोग्य सेवेवरील ताण कमी करता येऊ शकतो. बालरोग तज्ज्ञाची रुग्णालयात आवश्यकता आहे. यादृष्टीने पाठपुरावा केला जात आहे.- डॉ. सूर्यकांत बाबर, वैद्यकीय अधीक्षक, मूल
उपजिल्हा रुग्णालयात ९४ सिझेरियन यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:23 PM
जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने एक कोटी ६५ लाख रूपये खर्च करुन बांधलेल्या येथील उपजिल्हा रुग्णालयावर स्त्री रोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाल्याने वर्षभरात ९४ सिझेरियन डिलव्हरी यशस्वीरित्या पूर्ण करणे शक्य होऊ शकल्या. कठीण परिस्थिती चंद्रपूरला रेफर करण्यासाठी होणारी रूग्णांच्या नातेवाईकांची धावपळ झाली. मात्र उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त पदाचे ग्रहण सुटले नाही. ही पदे तातडीने भरल्यास रुग्णांना उपचारासाठी अन्यत्र जाण्याची गरज उरणार नाही.
ठळक मुद्देकुटुंबीयांना दिलासा : सर्व विभागातील रिक्त पदेही भरावी