शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

गटशेतीतून कृषी विकासाचा प्रयोग यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 10:41 PM

गटशेतीतून कृषि विकास प्रयोग यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांचीच असून याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंदवन येथे आयोजित जिल्हयातील गट शेती समूहांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात दिली आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : आनंदवन येथे गटशेती समूहांचे प्रशिक्षण, अनेकांनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गटशेतीतून कृषि विकास प्रयोग यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांचीच असून याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंदवन येथे आयोजित जिल्हयातील गट शेती समूहांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात दिली आहे.यावेळी डॉ. विकास आमटे, माजी आमदार संजय देवतळे, जि.प. सभापती अर्चना जीवतोडे, वरोरा प.स. सभापती रोहिणी देवतळे, राहुल सराफ, जि.प. सदस्य मारोती गायकवाड, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, नरेंद्र जीवतोडे, उपविभागीय अधिकारी (कृषि) राजवाडे, पाटील, गौतम करार, पोतदार, महारोगी सेवा समिती संचालक कडू यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.ना. अहीर पुढे म्हणाले, सबका साथ, सबका विकास ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा आहे. तर गटशेतीच्या माध्यमातून त्याला प्रतिसाद म्हणून समूह शेती, समूह विकास हा आहे. आपला देश कृषि प्रधान आहे, असे आपण म्हणत असलो तरी मागील सरकारच्या काळात अन्नधान्य आयात करावे लागत होते तर या सरकारच्या काळात अन्नधान्य निर्यात करू लागलो हे मोठे यश आहे. रस्ते विकासाकरिता सीआरएफ फंडप्रमाणे कृषि सिंचनाकरिता निधी उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी आपण मागील सरकारकडे केली होती. परंतु नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्याबरोबर पहिल्यांदा देशात प्रधानमंत्री कृषि सिंचनावर तरतू करण्यात आली आहे. याचा अर्थ हे सरकार कृषि पोषक सरकार आहे, हेच सिध्द होते. गटशेतीच्या माध्यमातून अन्नधान्य, प्रोसेसिंग व मार्केटींग हे सर्व उपक्रम राबविण्याची तरतूद असून शेतकरी गट शेती व्यापारात समोर आल्यास हे एक पुरोगामी पाऊल ठरेल. रसायनमुक्त अन्नधान्याची गरज जगात असून त्याकरिता जादा किंमत जग मोजण्यास तयार आहे व निर्यातीस मोठा वाव आहे. या संधीचा उपयोग शेतकऱ्यांनी करण्यासाठी गट शेती करणाऱ्या समुहानी समोर येण्याचे आवाहन ना. अहीर यांनी केले.शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, सहनशील आहे म्हणूनच सरकारे टिकून आहेत, असे मत नोंदवून ना. अहीर म्हणाले की, यापुढे देशात पुल वजा बंधारे बांधण्याचे धोरण ना. नितीन गडकरी यांनी निश्चित केल्याने देशाची सिंचन क्षमता वाढणार आहे.आनंदवन हे यापुढे शेती प्रयोगाची पंढरी होणार असून गट शेतीच्या शेतकरी समूहासाठी ते प्रेरणास्थान राहणार आहे. आनंदवन समूह गटशेती शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे समाधान असल्याचे मत ना. अहीर यांनी नोंदविले. या प्रशिक्षणात चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा व अमरावती येथून एकूण १३ गट उपस्थित होते. तर त्यांच्या माध्यमातून जवळपास तीनशे शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.