राजेश मडावी।आॅनलाईन लोकमतवीज वितरण कंपनीच्या चंद्रपूर परिमंडळात गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होतो. दोन्ही जिल्ह्यात ७ लाख ९ हजार २६० वीज ग्राहक आहेत. घरगुती, वाणिज्य व कृषी क्षेत्रातील वीज वापरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीने कोणते पाऊल उचलले, वीज गळती, शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा आणि आधुनिक तांत्रिक बदलातून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सोईसुविधांबाबत नेमकी काय स्थिती आहे ? जिल्ह्यातील ४ लाख ७ हजार ६६५ ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा होतो काय ? या विषयी वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांच्याशी साधलेला संवाद...जिल्ह्यातील वीज क्षमतेसाठी यांत्रिक सामग्री पुरेशी आहे का?वीज वितरण कंपनीने ग्राहकांना सेवा देण्यासाठी आमूलाग्र बदलाचे धोरण तयार केले. त्याची अंमलबजावणीदेखील प्रभावीपणे केली जात आहे. उपकेंद्र, अतिरिक्त रोहित्र, ३३ केव्ही उपकेंद्रांमधील क्षमता वाढ, नविन वितरण रोहित्रे, उच्च व लघुदाब वाहिनी उभारण्यात उद्दिष्ठांपेक्षाही मोठे यश आले. या सर्व संयंत्राच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. २०१७-१८ मध्ये कोट्यवधी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. तांत्रिक कामांची गुणवत्ता आणि ग्राहकांच्या गरजांमध्ये मेळ घालूनच कंपनीची वाटचाल सुरू आहे.सामान्यत: कृषिपंपासंदर्भात तक्रारी होतात. निरसनासाठी कोणती विशेष व्यवस्था आहे ?जिल्ह्यामध्ये ३१ मार्च २०१४ पर्यंत ४१ हजार ९३६ कृषी पंप होते. २०१४-१७ मध्ये १५ हजार ६२९ पूर्ण झालीत. २०१७-१८ या वर्षात ३ हजार ७६२ कृषी पंपांची कामे सुरू आहेत. शेतकºयांना कृषी सिंचनासाठी अडचणी येणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. शेतकºयांनी तक्रारी केल्यास तातडीने निरसन केले जाते. त्यासाठी कर्मचाºयांना प्रशिक्षण देवून विशेष कक्ष तयार करण्यात आले. तक्रारींचे प्रमाण कमी झाले. नियमाच्या चौकटीत असलेली शेतकऱ्यांची कामे कधीही अडविली जात नाही. कंपनीने शेतकºयांचे हित लक्षात घेवून जिल्ह्यात मूलभूत स्वरूपाची कामे करून गावखेड्यांमध्ये अविरत वीजसेवा पोहोचविण्यात येत आहे.थकीत वसुलीसाठी कायदेशीर बडगा उगारला जात नाही, असा आक्षेप आहे ?थकीत वसुलीच्या संदर्भात जानेवारी ते डिसेंबर २०१७ या कालखंडाचा विचार केल्यास केवळ चंद्रपूर परिमंडळातच दीड हजार वीज चोºया पकडून २ कोटी ९६ लाखांची वसुली करण्यात आली.मिटर रिडिंग प्रमाणकानुसारच तंतोतंत व्हावे, याकरिता ४०० कर्मचाºयांची विशेष कार्यशाळा घेण्यात आली. एकूणच या यंत्रणेत ग्राहकाभिमुख सुधारणा झपाट्याने होत आहेत. चंद्रपूर परिमंडळात दरमहा ९९ टक्के वसुली होते. अचूक आणि वेळेत बिल दिल्याचाच हा परिणाम आहे. विशेष म्हणजे, २८ हजार ग्राहक आॅनलाईन बिल भरतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार केल्यास ग्राहकांना कोणत्याही अडचणींचा सामना करण्याची वेळ येणार नाही.चंद्रपूर परिमंडळात गळतीचे प्रमाण किती आहे ?या परिमंडळात ११.२९ टक्के वीज गळती असून हे प्रमाण धोकादायक मानले जात नाही. चंद्रपूर जिल्ह्यात ८.७१ तर गडचिरोली जिल्ह्यात १८ टक्के वीज गळती होते. गडचिरोलीचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू आहेत. हे प्रमाण निश्चितपणे कमी होवू शकेल. नवीन वीज खांब उभारताना बऱ्याचदा अडचणी येतात. त्यातूनही मार्ग काढून अखंडपणे वीज पुरवठा सुरू आहे.उपेक्षित घटकांसाठी कोणत्या योजना सुरू आहेत ?दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, एकात्मिक उर्जा विकास योजना आणि पायाभूत आराखड्यातंर्गत उपेक्षित समाज घटकांसाठी कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील १३ हजार ६३२ दारिद्ररेषेखालील लाभधारकांना नविन वीज जोडणी देण्यात येणार असून विद्युत वाहिनी नुतनीकरण व बळकटीकरण योजना तसेच जलयुक्त शिवारातूनही अनेक कामे प्रस्तावित आहेत. कंपनीने बदलत्या काळानुसार नविन वीज जोडणी अपॅ आणि कर्मचारी मित्र अॅप सुरू केले. ग्राहकांनी या आधुनिक तांत्रिक सोईसुविधांचा लाभ घेतला पाहिजे.थकित बिलाविषयी शंका असल्यास तातडीने तक्रार नोंदवावी. कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी सौजन्याने वागावे, अशी शिस्त लावण्यात आली. त्याचे विधायक परिणाम दिसून येत आहे. ग्राहकांच्या हिताचा विचार करूनच २९ उपविभागात ग्राहक जनसंपर्क मेळावे घेण्यात आले.
वीज ग्राहकांना अचूक बिल देण्यास यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:11 PM
वीज वितरण कंपनीच्या चंद्रपूर परिमंडळात गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होतो. दोन्ही जिल्ह्यात ७ लाख ९ हजार २६० वीज ग्राहक आहेत. घरगुती, वाणिज्य व कृषी क्षेत्रातील वीज वापरात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
ठळक मुद्देआधुनिक तंत्रज्ञानावर भर : चंद्रपूर परिमंडळातील ७ लाख ९ हजार ग्राहकांना अखंड पुरवठा