चंद्रपूर : वेध संविधानिक नितिमत्ता निर्माणाचा आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षाचे शिक्षण घेत प्रलय म्हशाखेत्री याने व्दितीय क्रमांक मिळविला आहे. जातनिहाय जनगणनेने जातीभेद मिटणार, या विषयांवर ही स्पर्धा घेण्यात आली.
मागील सात-आठ महिन्यापासून कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे अनेक महापुरुषांच्या जयंती, उत्सव कार्यक्रम अनेक सामाजिक संघटनेने ऑनलाइन स्वरूपात घेणे सुरु केले आहे. अशातच वेध संविधानिक नितिमत्ता निर्माणाचा यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून अनेकांनी आपले मत व्यक्त केले. यात प्रलयने द्वितीय क्रमांक मिळविला. या यशानिमीत्त प्रलयचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सतीश मालेकर, प्रा. अनिल डहाके, विक्रांत टोंगे, कामेश कूरेकर, मयूर पाऊणकर, महेश बावणे, नोमेश मडावी, आशिष कोरडे आदी उपस्थित होते. प्रलयने आपल्या यशाचे श्रेय आई-बाबा, शिक्षक, मित्रमंडळ आणि मार्गदर्शकांना दिले.