शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

कठोर परिश्रमातूनच यशप्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:36 PM

कठोर परिश्रम केल्यानंतर यश नक्कीच प्राप्त होते. त्यामुळे यशस्वी होण्याच्या जिद्दीने प्रयत्न करा, तेव्हाच तुम्ही जग जिंकू शकता, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.

ठळक मुद्देमहेश्वर रेड्डी : चंद्रपुरात टिपू सुलतान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कठोर परिश्रम केल्यानंतर यश नक्कीच प्राप्त होते. त्यामुळे यशस्वी होण्याच्या जिद्दीने प्रयत्न करा, तेव्हाच तुम्ही जग जिंकू शकता, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले.शेर ए-हिंद शेर ए म्हैसूर टिपू सुलतान यांची २६८ वी जयंती रविवारी चंद्रपुरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान रविवारी सायंकाळी शहरातील मुख्य मार्गाने हजरत टिपू सुलतान फांऊडेशनच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. माधुरी मानवटकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अमजद शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून अंनिसचे हरिभाऊ पाथोडे, अनिल दहागावकर, आसरा फांऊडेशन नागपूरच्या जीशान शेख, जिलानी भाई, प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिल्ली येथील समीर सिद्दिकी, सहाय्यक आयुक्त नितीश पाथोडे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना समीर सिद्दीकी म्हणाले, टिपू सुलतान हे धर्मनिरपेक्ष होते. त्यांनी हिंदू मंदिरासाठी केलेल्या कार्यावर त्यांनी मार्गदर्शन केले.नितीश पाथोडे यांनी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.तसेच स्पर्धा परीक्षेतून जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी बनण्याचा मुलमंत्र उपस्थितांना दिला. तर मुजावर अली यांनी सायबर गुन्हे रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. तसेच पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर टिपू सुलतान यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण करणयात आले.संचालन नौशाद सिद्दिकी, प्रास्ताविक अली असगर, आभार झुबेर आझाद यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक तसेच टिपू सुलताना संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.