शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

चार सोसायट्यांमधील धान खरेदी अचानक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 6:00 AM

शासनाने यावर्षी तालुक्यातील काही आदिवासी सोसायट्यांना व पणन महासंघाने संस्था संचालित करीत असलेल्या भात गिरण्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायट्यांचे हमीभाव १८३५ अधिक ५०० बोनस व २०० रुपये सानुग्रह देत असल्याने शेतकरी आपले धान सोसायटी व पणन केंद्रावरच विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

ठळक मुद्देजागा व बारदान्याचा अभाव : शेतकऱ्यांमध्ये नाराजी

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कृउबास आणि खुल्या बाजारापेक्षा पणन महासंघ व आदिवासी सोसायट्यांमध्ये धानाला जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा धान विक्रीचा कल सोसायट्यांकडे वाढला आहे. नागभीड तालुक्यात आतापर्यंत आठ आदिवासी सोसायट्या व पणन महासंघाच्या दोन केंद्रामार्फत धान खरेदी सुरू होती. मात्र बारदान्याअभावी दोन आदिवासी सोसायट्यांनी तर पणन महासंघाच्या दोन केंद्रांनी धान खरेदी बंद केली आहे.नागभीड तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. एकूण क्षेत्रफळापैकी ३० हजार हेक्टर क्षेत्रात धानाचे उत्पादन होते. नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात धानाचे पीक शेतकऱ्यांच्या हातात येते. यानंतर शेतकरी आपले धान विक्रीसाठी काढत असतात, असा आजवरचा अनुभव आहे.शासनाने यावर्षी तालुक्यातील काही आदिवासी सोसायट्यांना व पणन महासंघाने संस्था संचालित करीत असलेल्या भात गिरण्यांना धान खरेदीचे अधिकार दिले आहेत. या सोसायट्यांचे हमीभाव १८३५ अधिक ५०० बोनस व २०० रुपये सानुग्रह देत असल्याने शेतकरी आपले धान सोसायटी व पणन केंद्रावरच विक्री करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धानाचे भाव एक हजार ९०० ते २ हजार रूपयांच्या पलिकडे नसल्याची माहिती आहे.दरामधील ही तफावत लक्षात घेता बहुतांशी शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आपला मोर्चा आदिवासी सोसायट्या व पणन महासंघाच्या केंद्राकडे वळविला आहे. मात्र गोविंदपूर सोसायटीने बारदाना उपलब्ध नसल्यामुळे धान खरेदी बंद केली आहे. तर सावरगाव सोसायटीने धान ठेवण्यासाठी जागा आणि बारदानाही उपलब्ध नसल्याने धान खरेदी बंद केली असल्याची माहिती संबंधित सुत्राने दिली आहे.नागभीड व कोर्धा केंद्र बंदपणन महासंघाकडून नागभीड व कोर्धा येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र १३ दिवसांपासून बारदान्याअभावी या दोन्ही केंद्रांची धान खरेदी बंद आहे. याठिकाणी बारदाना हा कलकत्ता येथून येतो, अशी माहिती आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही दोन्ही केंद्रे अतिशय महत्त्वाची आहेत. विचारणा करण्यासाठी शेतकरी याठिकाणी येत असले तरी त्यांच्या पदरी निराशाच येत आहे.चुकारेही अडलेधानाची खरेदी झाल्यानंतर सात दिवसात शेतकºयांना सात दिवसात चुकारे दिल्या गेले पाहिजे, असा नियम असल्याचे समजते. मात्र नागभीड केंद्रावर गेल्या अनेक दिवसांपासून चुकारेच दिल्या गेले नाही. ४ जानेवारी रोजी याठिकाणी शेवटचा पेमेंट आला होता. त्यानंतर पेमेंटच आले नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड