ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : शुक्रवारी सकाळी जिल्ह्यात सर्व तालुक्यात रिमझीम अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. अनेकांना याचा त्रासही सहन करावा लागला. या पावसाने गहू, हरभरा या रबी पिकांना फटका बसला.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती. शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह नागभीड, कोरपना, सिंदेवाही, गोंडपिपरी, पोंभुर्णा, ब्रह्मपुरी आदी तालुक्यात रिमझिम पावसाला सुरूवात झाली. तर वरोरा, चिमूर, भद्रावती, मूल आदी तालुक्यात ढगाळ वातावरण होते. येथेही दुपारच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. चंद्रपूर शहरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे अनेकांना बाहेर पडताना अडगळीत पडलेले रेनकोट व छत्री हाती घ्यावी लागली.गहू, हरभरा, लाखोरी पिकाला धोकारबी हंगामात घेण्यात येणारी हरभरा, लाखोरी व गहू ही पीके साधारणत: पडणाऱ्या दवबिंदूवर आधारित असतात. हरभरा जवळपास काढून झाला आहे तर तर, गव्हाचे पीकही आता अंतिम टप्प्यात आहे. काही शेतकºयांनी लाखोरी, हरभरा कापून सुकण्यासाठी शेतात ठेवला होता. या पिकांना पावसाचा फटका बसला आहे.ब्रह्मपुरीत २.२ मिमी पावसाची नोंदब्रम्हपुरी तालुक्यात शुक्रवारी सकाळी २.२ मिमी पावसाची नोंद झाली. तर कोरपना तालुक्यातील वनसडी, कोरपना, पारडी, कोडसी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
अवकाळी पावसाची रिपरिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 1:03 AM
शुक्रवारी सकाळी जिल्ह्यात सर्व तालुक्यात रिमझीम अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. अनेकांना याचा त्रासही सहन करावा लागला.
ठळक मुद्देवातावरणात गारवा : रबी पिकांना मात्र फटका