लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरचे तापमाण राज्यात सर्वात जास्त असते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यांपासूनच मोठ्या प्रमाणात उन्ह तापायला लागले. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या उन्हाळ्यात उष्ण लाटेचा प्रभाव अधिक असणार असल्याची घोषणा झाल्याने कोणतीही अनुचित घटना होऊ नये, यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन करुन नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.चंद्रपूर प्रदूषणामध्ये अव्वल असल्यासाठी कृप्रसिद्ध आहे. त्यामुळे दरवर्षीच चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात उष्णता असते. परिणामी अनेकजणाचा उष्मघाताने बळी होत असल्याची घटना आपल्याकडे घडल्या आहेत. त्यामुळे यावर्षी सदर प्रकार टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तीनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच कपड्याने डोके, मान आणि चेहरा झाकण्यात यावा, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक आदींचा नियमित वापर करावा, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदींपासून उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत आणि चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे, घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर आणि सनशेडचा वापर करण्यात यावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे ओले कपडे यांचा वापर करावा, तसेच थंड पाण्याचे वेळोवेळी स्नान करावे, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी सकाळीच अधिक कामे उरकून घ्यावे, अशा सुचना करण्यात आल्या आहेत.उष्माघात ठरु शकतो धोकादायकउन्हाळ्यात अनेकांत उष्माघाताची लक्षणे आढळून येतात. हे धोकादायक ठरु शकते. चक्कर येणे, मळमळणे, डोकेदुखी, उलटी होणे अशी उष्मघाताची लक्षणे आहेत. त्यामुळे उन्हातून आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, पाणी पिण्यापूर्वी थंड पाण्याने हातपाय धुवावे, त्यानंतर थोड्या वेळानी पाणी प्यावे, शक्ततो लिंबूपाणी प्यावे, तसेच उन्हाळ्यात सर्वाधिक त्वेचेचे आजार जाणवतात. हे आजार टाळण्यासाठी उन्हात जाणे टाळावे, शक्यतो ‘सनकोट’ घालूनच बाहेर पडावे, तोंडाची त्वचा उघडी अल्यामुळे धूळ आणि उन्हाचा परिणाम होतो. त्यामुळे बाहेर पडताना चेहऱ्याला स्कार्फ बांधावा, टोपीचा वापर करावा, बाहेर जाण्यापूर्वी सनलोशन लावायचे असल्यजास ४५ मिनिटेपूर्वी लावावे.
आला उन्हाळा, आरोग्य सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 10:45 PM
चंद्रपूरचे तापमाण राज्यात सर्वात जास्त असते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यांपासूनच मोठ्या प्रमाणात उन्ह तापायला लागले. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या उन्हाळ्यात उष्ण लाटेचा प्रभाव अधिक असणार असल्याची घोषणा झाल्याने कोणतीही अनुचित घटना होऊ नये, यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देबाहेर पडताना सावध राहा : प्रशासनाच्या सूचना