लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महात्मा ज्योतीराव फुले यांनी १८७३ रोजी स्थापन केलेला सत्यशोधक समाज म्हणजे विज्ञानाच्या वेलीवर उमलेले सुर्यफूल आहे. आपण त्यांची एक-एक पाकळी घेण्याचा संकल्प केला पाहिजे, असे प्रतिपादन खुशाल तेलंग यांनी केले.सत्यशोधक समाज जिल्हा चंद्रपूरच्या वतीने सत्यशोधक समाज वर्धापन दिन सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिराचंद बोरकुटे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आय्युब कच्छी, अॅड. शंकर सागोरे, मैकू शेख, शाहिदा शेख डी. के. आरीकर, यशोधरा पोतनवार, अरुण धानोरकर, अॅड. प्रशांत सोनुले, डॉ. सुनील मुलकलवार, हरिदास देवगडे, बाबा थुलकर, अन्वर आलम मिझा आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना हिराचंद बोरकुटे म्हणाले, म. फुले यांचे जाती अंताविषयीचे, स्त्री- पुरुष समानतेचे आणि काल्पनीक देवी-देवता, धार्मिक कर्मकांडातून बाहेर पडण्याचे विचार स्विकारल्याशिवाय आपण सुखी होणार नाही. तर किशोर पोतनवार म्हणाले, आज देशात धार्मिक, सामाजिक विषमतेला उत आलेला आहे. धार्मिक उन्माद, खरे बोलणाºया पत्रकार आणि विचारवंताच्या हत्या या घटना देशाला घातक आहेत. त्याचा विरोध करुन सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रचार- प्रसार करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. एस. टी. चिकटे यांनी प्रास्ताविक प्रा. माधव गुरनुले तर उपस्थिताचे आभार सूर्यभान झाडे यांनी मानले.
सत्यशोधक समाज विज्ञान वेलीवरील सूर्यफूल : तेलंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 12:12 AM
महात्मा ज्योतीराव फुले यांनी १८७३ रोजी स्थापन केलेला सत्यशोधक समाज म्हणजे विज्ञानाच्या वेलीवर उमलेले सुर्यफूल आहे.
ठळक मुद्देसत्यशोधक समाज म्हणजे विज्ञानाच्या वेलीवर उमलेले सुर्यफूल