सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरसकोल्हे यांच्या प्रयत्नातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा सोमवारी करण्यात आला.
संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे होरपळून गेलेला आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजनची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील जनतेला आकस्मिक परिस्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा पडू नये. या बाबीची तातडीने दखल घेत जिल्हा परिषदच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरस्कोल्हे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड, आरोग्य सहाय्यक पेंदाम, मोरेश्वर बनकर, श्रीमती एस. ए. उइके, व्ही. एस. जांभुळे, ए. ए. बोरकर, मानापुरे, डॉ. प्राजक्ता लांजेवार, कोमल पराते, आर. डी. घोरे, वि. प. मोहुर्ले उपस्थित होते.