लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : बल्लारपूर तालुक्यातील श्रावण बाळ योजनेची १३७ व संजय गांधी निराधार योजनेचे ८७ प्रकरणांना संजय गांधी निराधार समिती ता. बल्लारपूरने मंजुरी दिली आहे. सदर समितीची बैठक बल्लारपूर तहसील कार्यालयात ३० आॅगस्टला घेण्यात आली. यात २८२ निराधारांचा शासकीय योजनांचे अनुदान मंजूर करून आधार दिला आहे.संजय गांधी निराधार समिती बल्लारपूरची सभा नुकतीच रेणुका दुधे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात समितीचे सदस्य रमेश पिपरे, अलोक साळवे, रूपदास सिडाम, चंद्रकांत येवले, मिनाताई चौधरी, तहसीलदार विकास अहीर व नायब तहसीलदार कुळसंगे उपस्थित होते. यात तालुक्यातून शहर व ग्रामीण भागातून २८२ केसेस मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यात संजय गांधी निराधार योजनेच्या १०० प्रकरणातून ८७ मंजूर व १३ प्रकरणे त्रुटीअभावी नामंजूर करण्यात आले तर श्रावणबाळ योजनेच्या १८२ प्रकरणातून १३७ मंजूर व ४५ प्रकरणे नामंजूर करण्यात आले. एकूण २८२ प्रकरणातून २२४ प्रकरणे मंजूर करण्यात आले. शासनाकडून लाभार्थ्यांना ६०० रुपये मासिक मदत मिळणार आहे. यामुळे निराश्रित, निराधार जीवन जगणाºयांना अनुदान प्राप्तीने आधार प्राप्त होवून जीवन जगण्यासाठी मोठी आर्थिक मदत होणार असल्याने लाभार्थी समाधान व्यक्त करीत आहेत. मंजूर लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचाºयांची भेट घेवून पुढील कागदपत्राची पूर्तत: करावी, असे आवाहन समितीच्या अध्यक्षा रेणुका दूधे यांनी केले आहे. तालुक्यातील निराधार व्यक्तींनी या योजनेसाठी अर्ज व कागदपत्रांची पूर्तत: करून संबंधित तलाठी यांच्याकडे द्यावे, त्रुट्या नसलेल्या लाभार्थ्यांचे प्रकरणे अनुदानासाठी पात्र करण्यात येईल.
बल्लारपूर तालुक्यातील २८२ निराधारांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 11:46 PM
बल्लारपूर तालुक्यातील श्रावण बाळ योजनेची १३७ व संजय गांधी निराधार योजनेचे ८७ प्रकरणांना संजय गांधी निराधार समिती ता. बल्लारपूरने मंजुरी दिली आहे.
ठळक मुद्देश्रावण बाळ योजना : संजय गांधी योजनेची ८७ प्रकरणे मंजूर