लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : राजुरा येथील वसतिगृहातील विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देण्याच्या मागणीसाठी राजुरा येथे आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला. यावेळी हजारो नागरिकांनी मोर्चात सहभागी होत प्रशासनाचे लक्ष वेधले.मोर्चेकऱ्यांच्या मागणीमध्ये संस्थाचालक व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्यावर अॅट्रासिटी अॅक्ट १९८९ अ व पास्को २०१८ अंतर्गत गुन्हा नोंदवून त्वरित अटक करा, मुख्याध्यापक, अधिक्षिका व इतर दोषी कर्मचाºयांवर अट्रासिटी व पास्को अंतर्गत गुन्हा नोंदवून अटक करा, इन्फंट जिजस इंग्लिश पब्लिक कॉन्व्हेंट स्कूल राजुराची मान्यता तत्काळ रद्द करा, मुख्य आरोपी छगन पचारे, निता ठाकरे व नरेंद्र विरूटकर यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, सदर प्रकरणात खाजगी डॉक्टारांनी हयगय केल्याने डॉ. पिंपळकर, डॉ. कतवारे यांच्यावर अट्रासिटी व पास्को अंतर्गत गुन्हा नोंदवून त्वरित अटक करा, राजुºयाचे ठाणेदार गायगोले यांनी गुन्हा नोंदविण्यात हयगय केल्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करा, पीडित मुलींना १०० टक्के न्याय मिळावा, यासााठी सीआयडी चौकशी करावी व समाजातील दोन सदस्य घेऊना पाच सदस्यांची समिती गठित अशा मागण्यांचा समावेश आहे.सर्वपक्षीय नेत्यांचा सहभागया जनआक्रोश मोर्चामध्ये भाजपाचे आमदार अॅड. संजय धोटे, शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप, श्रमिक एलगारच्या अध्यक्ष अॅड. पारोमिता गोस्वामी, भाजपाचे लोकसभा प्रमुख खुशाल बोंडे, शिवसेनेच जिल्हाध्यक्ष संदीप गिºहे, गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष मुक्ताबाई शेडमाके, माजी नगरसेविका राधाबाई आत्राम, बल्लारपूर पेपरमिल मजदूर संघटनेचे तारासिंह कलसी, एल अॅण्ड टी कामगार संघटनेचे शिवचंद्र काळे, रामपूर येथील महिला बचत गटाच्या अध्यक्षा लता कुळसंगे, पांढरकवडाचे माजी नगराध्यक्ष भाऊराव मरापे, रिपाईचे सिद्धार्थ पथाडे, बसपाचे राजु झोडे, शिवसेनेचे नितीन पिपरे, कविता गेडाम, अवंचित सयाम, सुवर्णा वरखेडे, ज्योत्सना मडावी, प्रभु राजगडकर, पप्पू देशमुख, प्रमोद बोरीकर, मनोज आत्राम, प्रविण पडवेकर, डॉ. अभिलाषा गावतुरे, महिपाल मडावी, बबन उरकुडे, धिरज मेश्राम, डॉ. मधूकर कोटनाके उपस्थित होते.
राजुऱ्यातील मोर्चाने वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:53 PM