लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील हायड्रोसिल आणि हर्नियाच्या रूग्णांकरिता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांच्यातर्फे नि:शुल्क शास्त्रक्रिया शिबिर ग्रामीण रूग्णालयात सिंदेवाही येथे पार पडले. या शिबिराचा शेकडो रूणांनी लाभ घेतला.या शिबिरात रूग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात १४३ हायड्रोसिल व ४३ हर्निया अशाप्रकारे १८३ रूग्णांवर शास्त्रक्रिया ग्रामीण रूग्णालय सिंदेवाही येथे करण्यात आली. यावेळी आ. विजय वडेट्टीवार यांनी भेट देवून रूणांची विचारपूस केली व ते म्हणाले, राजकारणात येण्यापुर्वी समाजकार्य करीत होतो. आताहे समाजकार्य आपण सोडलेला नसून याच समाजकार्यातून जनतेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. याच माध्यमातून ग्रामीण रूग्णालय सिंदेवाही, जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर यांच्या सहकार्याने हायड्रोसिल व हर्निया रूग्णांची निशुल्क तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले होते. याकरिता ८०० लोकाची तपासणी करण्यात आली असून तपासणी अंती या शिबिरामध्ये १४३ हायड्रोसिल व ४३ हर्निया अशाप्रकारे १८३ रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगितले.हा उपक्रम पुढेही सुरू राहणार असून सर्व नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, हे आमचे कर्तव्य असून यासाठी आमचे कर्यकर्ते कटिबध्द असतील, असेही ते म्हणाले.या शिबिरात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नावाडे, डॉ. बिसेन डॉ. बंडावार, डॉ. सोनटक्के, डॉ. विजय कडक्सर, डॉ. सुकेशनी जिवने, डॉ. कलयानी बेसेकर, डॉ. विक्रांत धावडे, डॉ. अश्विनी अगडे, डॉ. धिरज मेश्राम, डॉ. विजय कडस्कर, डॉ. नागमोती, डॉ. रोषणी राऊत, डॉ. तामगाडगे, डॉ. दगडी, डॉ. सतिष चिंतावार या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्या.तर शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा काँग्रेसचे महासचिव अरूण कोलते, जि. प. सदस्य रमाकांत लोंधे, हरिदास बारेकर, राहुल पटेल, राहुल पोरेड्डोवार, नरेंद्र भैसारे, सचिन नाडमवार, नागेश गोलपल्लीवार यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
सिंदेवाहीत आयोजित हायड्रोसिल व हर्निया शिबिरात १८३ रूणांवर शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:16 AM
सिंदेवाही तालुक्यातील हायड्रोसिल आणि हर्नियाच्या रूग्णांकरिता ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांच्यातर्फे नि:शुल्क शास्त्रक्रिया शिबिर ग्रामीण रूग्णालयात सिंदेवाही येथे पार पडले.
ठळक मुद्देशेकडो रूग्णांची तपासणी : विजय वडेट्टीवार यांच्यातर्फे शिबिर