मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे. तेलंगणा सीमेलगत असलेले रस्ते खराब झाले आहेत. या भागातील बहुतांश कुटुंबे तेलगू भाषक असल्याने तेलंगणा प्रदेशाशी जास्त संबंध असतो. त्यामुळे त्यांना तेलंगणात ये-जा करावी लागते. तेलंगणा प्रदेशाला जोडणाऱ्या या मार्गात महाराष्ट्रातील कोरपना, जिवती व राजुरा तालुक्यातील भेंडवी, कावळगोंदी, येरगव्हाण, उमरझरा, देवापूर, काकळघाट, भुरकुंडा, सुकडपल्ली, मोरलीगुडा, गेरेगुडा, सिद्धेश्वर आदी गावे येतात. या मार्गावरून जड वाहतूक सुरू असते. त्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. तेलंगणा प्रदेशाला जोडणाऱ्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे दुचाकी, चारचाकी बस वेळेवर पोहोचत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
160821\img_20210718_125630.jpg
येरगव्हाण देवाडा रस्त्याचे फोटो