ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रामध्ये मागील नऊ महिन्यांपासून वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर लक्ष्मी शहा कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांची तक्रार, तसेच अन्य कारणांमुळे त्यांना २१ मे रोजी उपवनसंरक्षकांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. या संदर्भातील उत्तर २४ मेपर्यंत देण्याचे आदेश देण्यात आले असतानाही आपली बाजू ऐकून न घेता उपवनसंरक्षकांनी २१ मे रोजी निलंबनाचा प्रस्ताव मुख्य वनसंरक्षकाकडे पाठविला. त्यानंतर मुख्य वनसंरक्षकांनी आपल्याला २४ मे रोजी निलंबित केले. मागील १६ वर्षांपासून या विभागात कार्यरत असून वेळोवेळी कर्मचाऱ्यांना कामाबद्दल मार्गदर्शन केले आहे. उपवनसंरक्षकांनी खोट्या आरोपात अडकविले असून आपल्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, मागणी मागणीही पत्राद्वारे शहा यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे केली आहे.
बाॅक्स
निलंबन मागे घेण्याची संघटनेची मागणी
वनक्षेत्रपाल लक्ष्मी शहा यांच्यावर अन्याय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन त्वरित रद्द करावे, अशी मागणी फाॅरेस्ट असोसिएशनचे अध्यक्ष बि. के. तुपे यांनी मुख्य वनसंरक्षकाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोट
वनक्षेत्रपाल लक्ष्मी शहा यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. कामात अनियमितता, तसेच कर्मचाऱ्यांवर दबाव असे आरोप होते. त्यामुळे मुख्य वनसंरक्षकांना याबाबत पत्र पाठविण्यात आले. त्यांनी निलंबित केले. सध्या त्यांची एसीएफ महिला कर्मचारी चौकशी करीत आहे. यामध्ये सत्य बाहेर येईल.
- दीपेश मल्होत्रा
डीसीएफ, ब्रह्मपुरी