शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

क्षुल्लक भांडणात निघाल्या तलवारी

By admin | Published: September 20, 2015 1:23 AM

स्थानिक घुटकाळा तलाव परिसरात दुकानासमोर वाहन लावण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली.

वाहन पेटविले : सहा जखमी, पाच जणांना अटक, घुटकाळा तलाव परिसरात तणावचंद्रपूर : स्थानिक घुटकाळा तलाव परिसरात दुकानासमोर वाहन लावण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या दरम्यान, सत्तूर, तलवारी चालल्या. त्यात दोनही गटातील लोक गंभीर जखमी झालेत. दुकानासमोर उभे करण्यात आलेले वाहनही पेटवून देण्यात आले. या घटनेमुळे या परिसरात रात्री उशिरापर्यंत तणाव होता. अग्नीशमन दलाच्या मदतीने पेटविलेले वाहन विझविण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दंगा नियंत्रण पथकाससह रामनगर व शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पोहचला. त्यानंतर हाणामारीतील जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकरणी दोनही गटांतील १८ जणांविरुद्ध भादंवि १४७, १४८, १४९, ३०७,४५२, ४३५, ४२७, आर्मअ‍ॅक्टअन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांपैकी पाचजणांना शहर पोलिसांनी अटक केली. शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक घुटकाळा तलाव परिसरातील दुकानासमोर वाहन उभे केल्याच्या कारणावरून सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास वादाची ठिणगी पडली. दुकानासमोर वाहन ठेवण्याबाबत मो.राजीक यांनी हटकले असता, नुरू, भुऱ्या, वसीम, जमिल कुरेशी, शकील कुरेशी व अन्य तिघांनी संगनमत करून मो.अब्दूल राजिक यांचा भाऊ बिलाल मो.ईब्राहिम, दुकानातील दिवाणजी, नोकर मो.हाफीज, अल्लाउद्दीन खान यांच्यावर तलवार, सत्तूर व लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी मो.अब्दूल राजीक यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. दुसऱ्या गटाकडून फातीमा अब्दूल वहाब यांनी शहर पोलिसांकडे तक्रार केली. फातीमा यांच्या तक्रारीनुसार, हबीब मेमन, वकील खान, मो.बिलाल, मो.ईब्राहिम, शकील, अब्दूल राजीक व अन्य चार जणांनी नुरू, वसिम कुरेशी यांच्यावर लाठ्या, काठ्या, व रॉडने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. अशा तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी हबीब मेमन यांच्यासह त्यांच्या अन्य साथिदारांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. सायंकाळी ७.३० वाजतापासून सुरू झालेला हा राडा रात्री ११ वाजता शमला. या घटनेमुळे परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. कायदा व सुव्यवस्था लक्षात घेता, या परिसरात रात्रभर दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले होते. (प्रतिनिधी)पोलिसांची धावाधावएकीकडे शहरात जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात असताना, दुसरीकडे घुटकाळा परिसरात क्षुल्लक कारणावरून तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यातून वाहन पेटवून देण्यात आले. दोन गटातील सदस्यांनी एकमेकावर तलवारी, सत्तूर चालविले. घटना अतिशय गंभीर असल्याने चंद्रपूर शहर पोलीस, रामनगर पोलीस घटनास्थळी पोहचले. दंगानियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले. वादावादी करणाऱ्यांना आवरताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून या परिसरात मोठा पोलीस ताफा तैनात करण्यात आला होता.