शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

ताडोबा आधुनिक भारतातील निसर्ग तीर्थक्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:47 AM

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या विदर्भातून याची सुरूवात होते. विदर्भ म्हटले की समृद्ध जंगल आणि त्यातील वन्यप्राणी जीवन हेच समीकरण समोर येते.

ठळक मुद्देसिंधुताई सपकाळ : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पहिल्यांदा भेट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या विदर्भातून याची सुरूवात होते. विदर्भ म्हटले की समृद्ध जंगल आणि त्यातील वन्यप्राणी जीवन हेच समीकरण समोर येते. हमखास व्याघ्र दर्शनासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा आधुनिक जगातील निसर्ग तीर्थक्षेत्र होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांची माई डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केले.वृक्षदिंडी आणि स्वच्छता महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमासाठी माई आल्यावर त्यांनी पहिल्यांदा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यावेळी प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संवाद साधला यावेळी त्या बोलत होत्या.पुढे बोलताना सिंधुताई म्हणाल्या, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा भारताचे भूषण आणि संपूर्ण जगाचे वैभव आहे. ताडोबा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटकांना आकर्षित करणारा प्रकल्प आहे. येथे असलेली वाघांची संख्याही इतरत्र असलेल्या प्रकल्पांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला वाघाचे दर्शन हे हमखास लाभतेच. दरवर्षी लाखोंच्या संखेने पर्यटक ताडोबाला येतात. ही बाब महत्त्वाची वाटते.कारण गोरगरीब तरुणांना, स्थानिकांच्या हाताला रोजगार मिळतो, त्यांचा आर्थिक स्तर उंचावतो. ताडोबामध्ये वाघ पहायला येणाºया पर्यटकांनी उच्छाद मांडू नये, आरडाओरड करू नये, गोंधळ घालू नये, आपल्या कृतीतून वाघ किंवा इतर कुठल्याही वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला किंवा वनसंपदेला, जैवविविधतेला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यावी, अस आवाहन सिंधुतार्इंनी पर्यटकांना उद्देशून केले. पर्यटकांना निसर्गाचे महत्त्व कळावे आणि पर्यटनाबरोबच नैसर्गिक सौदर्य अबाधीत रहावे, पर्यटकांना चांगल्या सुविधा द्याव्यात, पर्यटकांमध्ये वाघांच्या संरक्षणासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाने अधिक जनजागृती करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी चंद्रपूरचे मानद वन्यजीव रक्षक अमोल बैस, शैलेंद्र बैस, ममता बालसदन पुणेचे व्यवस्थापक दीपक गायकवाड उपस्थित होते.मुनगंटीवारांमुळे वनविभागाला मिळाली ओळखराज्याचे कर्तबगार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा वन विभागाला ओळख दिली आहे, वन विभागाचे कार्य लोकाभिमुख झाले. त्यासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांनी साडेचार वर्षात जीव ओतून काम केले आहे. ही बाब महत्त्वपूर्ण असून असा वनमंत्री होणे नाही, या शब्दात सिंधुतार्इंनी वनमंत्र्यांच्या कार्याची प्रशंसा केली. वाघांचे रक्षण करताना गोमातेला विसरू नका. तिला आपल्या काळजात जागा दिली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.वाघोबांची पूजा करणारा माझा भारतआजवर मी जगभरातील जवळपास २२ देशात फिरून आले आहे. देवळातले देव मी खूप पाहिले. पण आज जंगलातला देव पहिल्यांदा बघितला. उभ्या आयुष्यात प्रथमच मी ताडोबाला भेट दिली. तेव्हा मला इथे अनेक ठिकाणी वाघोबाचे मंदिर दिसले, वाघोबाला ताडोबातील स्थानिक लोक निसर्गदेवता मानून पूजा करतात. ही बाब मला अधिक आवडली आहे. कारण आतापर्यंत लोक स्वत:हून वाघोबांची पूजा करतात हे माहित नव्हत. हे फक्त ताडोबाला आल्यावर दिसले. येथील लोक वाघांना मारत नाहीत. त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करतात, म्हणून बाबांनो वाघोबांची पूजा करणारा माझा भारत देश महानच आहे, असेही सिंधुताई सपकाळ म्हणाल्या.