लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरचे तापमान दिवसागणिक वाढत आहे. दुपारी रस्तेही ओस पडत आहेत. मात्र पर्यटकांनी वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गर्दी केली आहे. ३१ मेपर्यंत प्रकल्पातील बुकिंग फुल्ल झाले आहे. ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात देश- विदेशातील पर्यटकांचा ओघ वाढताना ुदिसून येत आहे.राज्यात सर्वाधिक वाघांची संख्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात आहेत. त्यामुळे पर्यकांची पहिली पसंती व्याघ्र पर्यटनात ताडोब्यालाच असते. पेंच, मेळघाट, बोर आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पांपेक्षा पुन्हा एकदा ताडोब्यालाच पर्यटकांनी पसंती दिलेली आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी महाराष्टÑ वन विकास महामंडळाने मोहुर्ली प्रवेशद्वारावर कँटरची सोय केलेली आहे. त्याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विदर्भातील तप्त उन्हाळ्यात निसर्गप्रेमी पर्यटकांचा जंगल पर्यटनाकडे कल वाढू लागला आहे.जंगल पर्यटनांचा बेत आखलेल्या पर्यटकांनी ताडोबाच्या कोलारा, मोहर्ली, नवेगाव, खुटवंडा, पांगडी, झरी या सहा प्रवेशद्वाराचे आगाऊ आॅनलाईन बुकिंग करुन ठेवले आहे.मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील काही प्रवेशद्वारातील किरकोळ जागांचा अपवाद वगळता ३१ मे पर्यंत आरक्षण फुल्ल झाले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या मुक्त संचारासोबतच आता काळे बिबटही आकर्षणाचे केंद्र ठरु लागले आहे. त्यामुळेही पर्यटकांनी गर्दी केलेली आहे.यात वाघांशिवाय बिबट, गवा, सांबर, चितळ, रानडुकर हे प्राणी आहेत. विदर्भातील उन्हाळा तापदायक असला तरी ताडोब्याला त्याचा फटका मागील उन्हाळ्यातही बसला नाही. उलट मे महिनाभर येथे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून आली. यामध्ये विदेशातील पर्यटकांसोबत सिनेकलावंत व राजकीय नेत्याचा समावेश आहे.तीन नवे प्रवेशद्वार सुरुताडोबा प्रकल्प विदर्भातच नाही तर देशपातळीवर प्रसिद्ध आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पूर्वी सात प्रवेशद्वार होते. आता त्यामध्ये सिरकाडा, माखला आणि झरी अशा तीन नवीन प्रवेशद्वारांची भर पडल्याने तो आकडा दहावर गेला आहे. या प्रवेशद्वारावरही आता पर्यटकांची बुकिंगसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर क्षेत्रातील निसर्ग पर्यटन हाऊसफूल्ल झाले आहे. वेळेवर येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी प्रत्येक प्रवेशद्वारावर तत्काळ बुकिंगची सोय आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्प मे महिन्यापर्यंत फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 1:03 AM
चंद्रपुरचे तापमान दिवसागणिक वाढत आहे. दुपारी रस्तेही ओस पडत आहेत. मात्र पर्यटकांनी वाघोबाच्या दर्शनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात गर्दी केली आहे. ३१ मेपर्यंत प्रकल्पातील बुकिंग फुल्ल झाले आहे.
ठळक मुद्देविदेशी पर्यटकांनाही भुरळ : कलावंतानीही दिली होती भेट