शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

पाण्यासाठी टाहो !

By admin | Published: January 08, 2016 1:44 AM

पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. सर्वात महत्त्वपूर्ण गरज समजले जाणारे पाणीच नागरिकांना मिळणे कठीण झाले आहे.

रवी जवळे चंद्रपूरपाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे चंद्रपूरकर त्रस्त झाले आहेत. सर्वात महत्त्वपूर्ण गरज समजले जाणारे पाणीच नागरिकांना मिळणे कठीण झाले आहे. सर्व बाजुने नागरिकांची ओरड झाल्यानंतर मनपाच्या आमसभेत पाणी पुरवठ्यावर बराच गदारोळ झाला. मनपाने टप्प्याटप्प्याने कारवाई करण्याचा निर्णयही दिला. प्रत्यक्षात ही कारवाई सुरुदेखील झाली आहे. मात्र पाणी पुरवठा काही सुरळीत झाला नाही. मनपा कारवाई करीत असली तरी या कारवाईमुळे नागरिकांना अजूनही दिलासा मिळू शकला नाही. चंद्रपूरकरांना पाणी हवे आहे, आणि त्यासाठी ते आजही टाहो फोडत आहेत. पाणीला जीवन म्हटले जाते. पाणी ही प्रत्येकाची मुलभूत व महत्त्वपूर्ण गरज आहे. प्रत्येकाला पाणी मिळणे हा त्याचा हक्कही आहे. मात्र चंद्रपूरकरांकडून हा हक्कच हिरावून घेतला जात आहे. ज्या इरई धरणातून चंद्रपूरला पाणी पुरवठा होतो, तिथेही मुबलक पाणी आहे. नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहचविण्याची यंत्रणाही अस्तित्वात आहे. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कंत्राटी कंपनी व कंपनीवर वचक ठेवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनही आहे. वरकरणी कुठेही मोठी अडचण दिसत नाही. तरीही नागरिकांना पाणी मिळणे दुरापस्त झाले आहे. चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. पूर्वी चंद्रपूरला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधीकरणाकडे होती. त्यावेळी एखादवेळी पाण्याची बोंब व्हायची. त्यानंतर पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेकडे देण्यात आली. बऱ्याच कालावधीपर्यंत नगरपालिकेने स्वत: ही जबाबदारी सांभाळली. त्यावेळी शहरात काही ठिकाणी पाईप लाईन बदलविण्यात आली होती. यालाही आता ५०-६० वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर पुढे कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे व वाढत्या कामाच्या ताणामुळे नगरपालिका प्रशासनाला शहराला पाणी पुरवठा करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले. पाणी पुरवठ्याचे खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या इरई धरणातून चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली पाईप लाईन ६० वर्ष जुनी असून खिळखिळी झाली आहे. ही पाईप लाईन केव्हाच कालबाह्य झाल्याचे महापालिका प्रशासनानेही मान्य केले आहे. असे असताना त्याच पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सध्या शहराचा पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीचे वितरण व्यवस्थेकडे अजिबात लक्ष नसल्याने शहरभर पाण्यासाठी बोंबा मारल्या जात आहे. नवीन कनेक्शन देऊन ही कंत्राट कंपनी मोकळी होते. पुढे त्या कनेक्शनधारकाला व्यवस्थित पाणी मिळत आहे की नाही, हे पाहण्याचे सौजन्यही दाखविले जात आहे. एखाद्याने पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली की त्याला पुन्हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील एक-दोन वॉर्ड सोडले तर जवळजवळ सर्वच वॉर्डात अनियमित व अत्यल्प पाणी पुरवठा होत आहे. हॉस्पीटल वार्ड, सिव्हील लाईन, रामनगर, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वार्ड, भानापेठ वार्ड, बालाजी वार्ड, एकोरी वार्ड, घुटकाळा वार्ड, जीवन ज्योती कॉलनी, तुकुम परिसरातील वार्ड आदी भागात अतिशय कमी पाणी पुरवठा केला जात आहे. कुठे एक तास तर कुठे त्याहून कमी पाणी येते. त्यातही धारही मोठी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. अनेकवेळा तर नळच येत नाही. पूर्वी नळ येत असला की तशी सूचना ध्वनीक्षेपकांमार्फत नागरिकांना दिली जात होती. आता संबंधित कंत्राटदाराला त्याचेही महत्त्व वाटत नाही.विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी नागरिकांना कोणतीही सूचना न देता नळ पहाटे ४ वाजता सोडण्यात येत होते. नागरिक सकाळी सात-आठ वाजता उठायचे, तेव्हा नळ गेला असायचा. यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. काही नागरिकांनी याबाबत कंत्राटदारांकडे जाऊन विचारणा केली असता त्यांना पहाटेच नळ सोडण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आताही काही ठिकाणी असाच प्रकार सुरू आहे. यामुळे नागरिक अक्षरश: वैतागले आहेत.शहराला हवे ४० दशलक्ष मीटर पाणीचंद्रपूर शहराची लोकसंख्या चार लाखांच्या घरात आहे. संपूर्ण शहराला दररोज ४० दशलक्ष मीटर पाण्याची गरज असल्याची माहिती मनपाचे अभियंता बोरीकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. प्रत्येक व्यक्तीला ९० ते १०० लिटर पाणी दररोज लागते. मात्र यापैकी ३० ते ३५ लिटरही पाणी दरडोई मिळत नाही.तक्रार करूनही दखल नाहीहॉस्पीटल वॉर्डात मागील अनेक दिवसांपासून पाण्यासाठी नागरिक त्रस्त आहेत. काही नळांमधून थोडेतरी पाणी येते. मात्र काही नळातून पाणीच येत नाही. आलेच तर एक गुंड भरायला २० मिनिटे लागतात. त्यानंतर अल्पावधीतच नळ बंद होतो. याबाबत नागरिकांनी उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र एकदोन ठिकाणी खोदकाम करण्यापलिकडे काहीही केले नाही.कारवाई करा; मात्र आधी पाणी द्यानागरिकांना कोणत्याही परिस्थितीत दररोज पाणी हवे आहे. पाणी पुरवठा सुरळीत नाही म्हणून मनपाद्वारे संबंधित कंपनीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून १ जानेवारीपासून पाणीपट्टी मनपा कार्यालयात भरण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. पुढे मनपा आणखी कारवाईचे दुसरे पाऊल उचलेल. यात बराच कालावधी लोटून जाईल. त्यामुळे मनपाने कारवाई करण्यासोबतच नागरिकांना दररोज पाणी मिळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.