लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डोक्यावर सूर्य आग ओकत आहे. पारा ४७ अंशापार गेला आहे. तप्त उन्हामुळे आधीच खोलात गेलेले जलस्रोत आता तळ गाठत आहे. जिल्ह्यातील जवळजवळ पंधराही तालुक्यातील पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात तर गावकरी पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.मागील वर्षी पावसाळ्यात वेळेवर पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे सर्व कामे आटोपून शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत बसला. मात्र मृग नक्षत्रात पाऊस बरसलाच नाही. त्यानंतरही पावसाने उशिराच हजेरी लावली. उशिरा आलेल्या या पावसात शेतकºयांनी बि-बियाणे पेरले. त्यानंतर पावसाची गरज होती. मात्र त्यावेळीही पावसाने दगा दिला. त्यामुळे शेतकºयांना दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणी करावी लागली. मध्यंतरीच्या काळात बºयापैकी पाऊस पडला. मात्र तेवढ्या पावसाने जलसाठ्यात मुबलक पाणी साठू शकले नाही. त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. अगदी परतीचा पाऊसही समाधानकारक पडला नाही. त्यामुळे शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हवा त्यावेळी पाऊस न पडल्याने पिकांवर रोगराईचे आक्रमण झाले. काही जणांची पिके सुकू लागली.यंदा अत्यल्प पाऊस पडल्याने जिल्ह्यातील धरणातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. डिसेंबर महिन्यातच या धरणातील जलसाठा चिंताजनक स्थितीत पोहचला होता. नलेश्वर, चंदई, लभानसराड या प्रकल्पात जानेवारी महिन्यात पाहिजे तसा जलसाठा नव्हता. आता मे महिना सुरू आहे.पाण्याची पातळी खालावल्याने नदी, नाले, तलाव, बोड्या हे ग्रामीण भागातील जलस्रोत चिंताजनक स्थितीत आले. जिल्ह्यातील सर्वच सिंचन प्रकल्प कोरडे पडायला लागले आहेत.आता उन्हाची तिव्रताही वाढत आहे. सूर्य आग ओकत आहे. तापमानाने उच्चांक गाठला आहे. ४७.३ अंशापर्यंत चंद्रपूरच्या तापनानो मजल मारली आहे. ग्रामीण भागातील जलस्रोट आटले आहे. नदी-नाल्यांसोबतच नागरिकांच्या घरातील विहिरी, बोअरवेल यांचेही पाणी कमी झाले आहे. एकूणच पाण्याची पातळीच खोल गेल्याने याचा सर्व जलस्रोतांवर परिणाम झाला आहे.जिल्ह्यातील एकही गाव असे नाही की जिथे पाणी टंचाई नाही. अनेक गावे टँकरने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी करीत आहेत. मात्र अद्यापही प्रशासनाला त्यांची हाक ऐकू आलेली नाही.पहाडावर भिषण परिस्थितीजिवती, कोरपना तालुक्यातील परिसर पहाडी भाग आहे. या परिसरातील नागरिक तर भिषण अवस्थेत जीवन जगत आहेत.आदिवासींचे गुडे पाण्याविना टाहो फोडत आहे. विशेष म्हणजे, या गुड्यातील नागरिकांना चक्क डबक्यातील पाणी पिऊन आपली व कुटुंबियांची तहान भागवावी लागत आहे. दरवर्षी हे विदारक चित्र समोर येते. मात्र संबंधित विभागाकडून यावर आजपर्यंत कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे आता येथील नागरिकही आहे त्या परिस्थितीतच वेळ निभावून नेत आहेत.पाऊस लांबला तर...यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर आहे. पाऊसही सरासरीहून अधिक पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात पावसाची अपेक्षा आहे. या कालावधीत पावसाचे आगमन झाले नाही किंवा पाऊस लांबला तर मोठ्या अडचणी निर्माण होणार आहे. पाण्यासाठी तर नागरिकांना आताच दाही दिशा पालथ्या घालाव्या लागत आहे. पाऊस लांबला तर जिल्ह्यात भिषण परिस्थिती निर्माण होऊ शकते.
पाण्यासाठी गावकऱ्यांचा टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 11:31 PM
डोक्यावर सूर्य आग ओकत आहे. पारा ४७ अंशापार गेला आहे. तप्त उन्हामुळे आधीच खोलात गेलेले जलस्रोत आता तळ गाठत आहे. जिल्ह्यातील जवळजवळ पंधराही तालुक्यातील पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात तर गावकरी पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.
ठळक मुद्देजलस्रोत कोरडे : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाणी टंचाई