लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुंबई येथील नायर हॉस्पिटच्या प्रसृती विभागात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारी डॉ. पायल तडवी हिने रॅगिंगमुळे आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येतला जबाबदार असणाºया सर्व वरिष्ठ डॉक्टरांना बडतर्फ करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भारिप बहुजन संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिले आहे.डॉ. तडवी ही अ.जा समाजातील असल्याने तिचे सिनिअर्स डॉ. हेमा अहुजा, अंकित खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहरे या तिला नेहमीच छळत होत्या. याबाबतची तक्रार तिने हॉस्पिटलमध्ये केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली. मात्र वरिष्ठांकडून त्रास वाढल्याने तिने आत्महत्या केली. त्यामुळे तिच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या डॉक्टरांना बडतर्फ करुन कठोर कारवाई करावी, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने त्याचे रजिस्ट्रेशन रद्द करावे, अॅट्रासिटी अॅक्टच्या तरतुदीनुसार आर्थिक मदत करावी यासह अन्य मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले.निवेदन देणाºया शिष्टमंडळात भारिपचे पूर्व जिल्हाध्यक्ष रामराव चव्हाण, पश्चिम जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, महासचिव धिरज बांबोळे, महिला जिल्हाध्यक्ष लता साव, शहर अध्यक्ष राजू किर्तक, महासचि रमेश ढेंगरे, महिला आघाडी महासचिव कविता गौरकर, रुपचंद निमगडे, निशा ढेंगरे, अॅड. विणा बोरकर, चंदा भूल, पौर्णिमा जुगधरे, अमर सरकाटे आदी उपस्थित होते.स्टुडंट रिपब्लिकन फेडरेशनतर्फे निषेधचंद्रपूर : डॉ. पायल तळवी यांच्या आत्हत्येला कारणीभूत असलेल्या खंडेलवाल, अहीर, आहुजा यांचा रिपब्लिकन स्टुडंन्ट फेडरेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निषेध करण्यात आला. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष राजस प्रवीण खोबरागडे, शहर अध्यक्ष संघपाल सरकाटे, सचिव रंजिता गाजरे, कोषाधयक्ष हर्षल खोबरागडे, प्रेमदास बोरकर, हरिदास देवगडे, अविनाश आमटे, निखिल जिवणे, यश उमरे, अमोल शेंडे, संघम शेलकर, गीता रामटेके, जान्हवी चांदेकर,श्रावस्ती तावाडे, वृषाली मसारकर, ज्योती शिवणकर, मृणाल कांबळे आदी उपस्थित होते.
‘त्या’ डॉक्टरांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:01 AM
मुंबई येथील नायर हॉस्पिटच्या प्रसृती विभागात पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारी डॉ. पायल तडवी हिने रॅगिंगमुळे आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येतला जबाबदार असणाºया सर्व वरिष्ठ डॉक्टरांना बडतर्फ करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन भारिप बहुजन संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिले आहे.
ठळक मुद्देभारिप बहुजन महासंघ : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन