लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा पैसा बँकाकडे जमा केला आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामासाठी खरीप पीक कर्ज देताना कोणतीही अडचण येता कामा नये. विनाकारण शेतकऱ्यांना त्रास दिल्याचे लक्षात आल्यास संबंधित बँकेवर कारवाई केली जाईल. उद्दिष्ट पूर्ण झालेच पाहिजे, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ते नागपूर येथे आयोजित चंद्रपूर जिल्ह्याच्या खरीप आढावा बैठकीत बोलत होते.या बैठकीला राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. अशोक नेते, आ. नाना श्यामकुळे, आ. संजय धोटे, आ. कीर्तीकुमार भांगडिया, आ. बाळू धानोरकर, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, मनपा आयुक्त संजय काकडे, मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी आदींसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज वाटपाचा आढावा घेतला. काही बँकांच्या उद्दीष्टांपैकी फारच कमी कर्ज वाटप झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पीक विमा योजने संदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार कमी रकमेचे धनादेश मिळत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईविभागीय तलाठी प्रशिक्षण केंद्रातील रिक्त पदे लवकर भरण्यात यावे, काही ठिकाणी दोन वर्षापेक्षा अधिक काळ लोटूनही अधिकारी रुजू झाले नाहीत. त्यांच्यावर गंभीर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.ग्रामसडक योजनेत जिल्ह्याची आघाडीमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत चंद्रपूर जिल्ह्याने आघाडी घेतली असल्याने मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. दुर्गम भागातील अपूर्ण राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.
विनाकारण त्रास देणाऱ्या बँकांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:36 AM
जिल्ह्यातील शेतकरी सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा पैसा बँकाकडे जमा केला आहे. त्यामुळे येणाºया हंगामासाठी खरीप पीक कर्ज देताना कोणतीही अडचण येता कामा नये.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे निर्देश : नागपुरात घेतला चंद्रपूर जिल्ह्यातील खरीप पिकाचा आढावा