लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब असून रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात आहेत. गेल्या आठवडाभरात चंद्रपूर शहरात नंदा बेहरम आणि काजल पाल या दोघींना आपला जीव गमवावा लागला आहे. तर राजुरा तालुक्यात सख्या भावंडाचा खड्डे अपघातात मृत्यू झाला. रस्ते बांधकामात झालेल्या गैरव्यवहारामुळे रस्त्यामध्ये खड्डे पडत आहेत. मनपा तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यासाठी दोषी असून रस्ते कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जनअधिकार सन्मान रक्षा संघर्ष समितीने अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले.यावेळी समितीचे अध्यक्ष सरदार हरविंदरसिंह धुन्ना, माजी नगरसेविका अमरजित कौर धुन्ना, रविंद्र बलकी, अरविंद मुच्युलवार, पप्पु शेंडे, सुशिलकुमार मिश्रा, निखिल राजुकर उपस्थित होते. रस्त्यांवर पडलेल्या खड्डयामुळे नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने मृतकांच्या कुटुंबियांना ५० लाखांची भरपाई द्यावी, रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात यावे, जड वाहतूक करणाऱ्या वाहनांची योग्य तपासणी करण्यात यावी, महानगरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे अपघात होवून अनेक नागरिकांचे हातपाय मोडले आहे, त्यांची सुद्धा दखल मनपा व बांधकाम विभागाने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी दुर्गा पाईनकर, साधना दुरूटकर, सीताबाई गजर, नसीम पठाण, सयाबाई भगाडे, मालावती चक्रवती, रेखा घोनमोडे, सुमन डेकाटे, विठ्ठल झुंगे, मंगळा भुसारी, तुळजाबाई भोयर, फैमिदा शेख, हमीद शेख, गजानन पोईनकर, श्याम उराडे, शेंबेकर, दीपक खाडीलकर, महेश तावाडे, अर्जूनसिंह धुन्ना आदी नागरिक उपस्थित होते.
रस्ते कामांची चौकशी करून कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 10:30 PM
शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब असून रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात आहेत. गेल्या आठवडाभरात चंद्रपूर शहरात नंदा बेहरम आणि काजल पाल या दोघींना आपला जीव गमवावा लागला आहे. तर राजुरा तालुक्यात सख्या भावंडाचा खड्डे अपघातात मृत्यू झाला. रस्ते बांधकामात झालेल्या गैरव्यवहारामुळे रस्त्यामध्ये खड्डे पडत आहेत.
ठळक मुद्देजनधिकार सन्मान रक्षा संघर्ष समिती : अधीक्षक अभियंता, मनपा आयुक्तांना निवेदन