आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : बदलते वातावरण आणि त्यावर आधारित शेतीमध्ये करायचे बदल, जोडधंदे, उद्योगधंदे, शेतीवरील उद्योग व वन्यजीवांपासून शेतमालाचे संरक्षण ते विविध योजनांचा लाभ घेऊन करायची शेती असे विविधांगी स्वरुप जिल्हा कृषी महोत्सवातील मार्गदर्शनामध्ये ठेवण्यात आले आहे. शेतीकडे व्यवसाय म्हणून बघणा-या शेतकºयांपासून तर शेतीवर आधारित उद्योगांमध्ये रस असणाऱ्या नवतरुणांनी या अमुल्य मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी महोत्सव, सेंद्रीय शेतमाल विक्री, महिला बचत गट मेळावा व मार्गदर्शन सत्रांचा एकत्रित अविष्कार १५ जानेवारीपासून चांदा क्लब ग्रांऊडवर सुरु होणार आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रमांची मेजवाणी असून कृषी तंत्रज्ञानासंदर्भात जिल्ह्याला पुढे नेणारा हा कार्यक्रम आहे.पालकमंत्री या कार्यक्रमाचे उद्घाटक असून देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर या कार्यक्रमाचे अध्यक्ष राहणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्वक्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून हा महोत्सव जिल्ह्यातील शेतक-यांसाठी माहितीचा खजिना ठरणार आहे.चंद्रपूरसारख्या आदिवासी बहुल व वनाच्छादित जिल्ह्यामध्ये शेती करताना येणाऱ्या अडचणी व चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरु होणारे व होऊ घातलेले उद्योग याबाबतही या महोत्सवात भरगच्च माहिती मिळणार आहे. प्रदर्शनासोबतच या ठिकाणी येणारे तज्ज्ञ शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठीही उपलब्ध असणार असून प्रयोगशिल शेतकऱ्यांनी या महोत्सवात अधिकाधिक वेळ द्यावा, असे ना. मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.असे असणार मार्गदर्शन सत्र१५ तारखेला उद्घाटनानंतर वन्यजीवांपासून शेतीस होणाऱ्या नुकसानीस आळा घालणे या विषयावर गोडपिंपरीचे निसर्ग सखा संस्थेचे अध्यक्ष दीपक वांडरे हॉल क्र.१ मध्ये मार्गदर्शन करतील. हॉल क्र.२ मध्ये प्रगतीशील शेतकरी मधुकर भलमे, शिवदास कोरे यांचे तुरपीकाचे भरीव उत्पादन कसे घ्यावे व सेंद्रीय शेती कमी खर्चात कशी करावी, यावर अनुक्रमे मार्गदर्शन. १६ जानेवारी हॉल क्र.१ मध्ये सकाळी ११ वाजता कृषी विज्ञान केंद्राच्या सोनाली लोखंडे यांचे जमीन आरोग्य पत्रिका व फळबाग लागवड यावर मार्गदर्शन. दुपारी १२.३० वाजता डॉ. पी.व्ही.शेंडे धान शेतीची वाणानुसार लागवड पध्दतीव मार्गदर्शन. यानंतर सोयाबीन शेती व्यवस्थापन व रब्बी पीक लागवडीवर डॉ. विनोद नागदेवते यांचे मार्गदर्शन. सायं. ४ वाजता डॉ.एम.वाय.पालारपवार जैविक खतांचे महत्त्व सांगतील. हॉल क्र.२ मध्ये शास्त्रोक्त कुक्कुटपालनावर ११ वाजता डॉ. मुकूंद कदम तर कृत्रीम रेतनाचे फायदे यावर डॉ.रेवतकर यांचे १२ वाजता मार्गदर्शन. दुपारच्या सत्रात नाबार्ड अधिकारी अजिनाथ टेले नाबार्ड व शेती निगडीत विविध योजनेची माहिती देतील. मधुमक्षीका पालनाची चंद्रपूर जिल्ह्यातील संधी यावर एस.टी.बघाडे हे मार्गदर्शन करतील.
कृषी तज्ञ्जांचा सल्ला व तंत्रज्ञानाचा लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 11:30 PM
बदलते वातावरण आणि त्यावर आधारित शेतीमध्ये करायचे बदल, जोडधंदे, उद्योगधंदे, शेतीवरील उद्योग व वन्यजीवांपासून शेतमालाचे संरक्षण ते विविध योजनांचा लाभ घेऊन करायची शेती असे विविधांगी स्वरुप जिल्हा कृषी महोत्सवातील मार्गदर्शनामध्ये ठेवण्यात आले आहे.
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : सोमवारपासून चांदा क्लबवर जिल्हा कृषी महोत्सव