आॅनलाईन लोकमतवरोरा : देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी हाच कणा असून त्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविले जात आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरिय कृषी मेळाव्यातील पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाना शामकुळे, स्वागताध्यक्ष तथा जि.प. सभापती अर्चना जिवतोडे, महापौर अंजली घोटेकर, माजी पालकमंत्री संजय देवतळे, उपमहापौर अनिल फुलझेले, जि.प. उपाध्यक्ष कृष्णा सहारे, विजय राऊत, खुशाल बोंडे, राहुल सराफ, बाबा भागडे, नरेंद्र जिवतोडे , जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे, जि. प. सभापती गोदावरी केंद्रे, जि.प. सभापती संतोष तंगडपल्लीवार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. हसनाबादे डॉ. विद्या मानकर उपस्थित होते.ना. अहीर म्हणाले, अनेक पदवीधर, उच्चशिक्षित युवक शेती व्यवसाय आज करीत आहेत. कृषी मेळाव्यातील ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून व्यावसायिक पद्धतीने शेती केली पाहिजे. शिवाय, शेतीपूरक व्यवसायांचाही पर्याय स्वीकारावा. रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत खराब होतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जैविक, सेंद्रीय व शेणखताचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रामदेव बाबा यांनी कृषी मेळाव्याला भेट देवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशीवरोरा, भद्रावती तालुक्यात चार लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रात शेती व्यवसाय आहे. शेतकºयांनी वैविध्यपूर्ण पिके घ्यावीत. फवारणी करताना मृत्यू ओढावलेल्या राज्यातील शेतकºयांना दोन लाख आणि गारपीट बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांनाही तत्काळ मदत देऊ, अशी ग्वाही ना. अहीर यांनी दिली. केंद्र सरकारने ग्रामीण विकासाकरिता १४ लाख कोटी दिले. शेतकºयांना शेतीपूरक व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी चंद्रपूर व वणी क्षेत्रामध्ये सुमारे दहा हजार शेतकऱ्यांना विविध वाणांचे बियाणे वाटप केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.तज्ज्ञांचे मार्गदर्शनहळद आणि दूधाला जागतिक स्तरावर मागणी आहे. जिल्ह्यात १४ ठिकाणी मदर डेअरीचे केंद्र सुरू करण्यात आले. गायी-म्हशींचे पालन केल्यास आर्थिक आधार मिळेल. सरकारकडून मूबलक निधी देण्यात येणार आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. ग्रामीण भागातील शेतकºयांच्या समस्या लक्षात घेवून विविध व्यवसाय उभारण्यासाठी तज्ज्ञांकडून तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.
प्रगतीसाठी आर्थिक योजनांचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:13 PM
देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी हाच कणा असून त्यांच्या विकासासाठी अनेक योजना राबविले जात आहेत. त्याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
ठळक मुद्देहंसराज अहीर : वरोरा येथे कृषी मेळावा