लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील अनेक दिवसांपासून विघ्नहर्त्या बाप्पाच्या आगमनासाठी तयारीत असलेल्या गणेशभक्तांनी शनिवारी भक्तीभावाने श्रीची प्रतिष्ठापणा केली. सध्या कोरोनाचा संकटकाळ सुरू आहे. कोरोना संसर्गाची भीती बाजुला सारत शनिवारी घरघुती गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी छोटा बाजार व हिंदी सिटी शाळेजवळील एकच गर्दी उसळली होती. आज जिल्ह्यात सर्वत्र हेच चित्र दिसून आले. प्रतिष्ठापनेनंतर दहा दिवस गणेश भक्तीची आराधना सुरू राहणार आहे. मानवावर आलेले कोरोना विषाणूचे विघ्न दूर कर, अशी प्रार्थना करीत नागरिकांनी श्रीला आपल्या घरात विराजमान केले.गणेशोत्सव हा एक सार्वजनिक उत्सव आहे. समाजामध्ये एकता असावी, उद्देशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आगमन झाले.कोरोनाचे विघ्न असले तरी विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापणा गरजेचीच. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून मूर्तीकार मूर्ती घडविण्यात मग्न होते. दरम्यान, शनिवारी शहरातील विविध भागात गणेशमूर्र्तींची लहान दुकाने लावण्यात आली. चंद्रपूर मनपाकडून हिंदी सीटी शाळा ते रघुवंशी कॉम्प्लेक्सदरम्यानच्या मार्गावर गणेशमूर्र्तींच्या दुकानांसाठी मंडप उभारून देण्यात आले. शनिवारी सकाळपासूनच या ठिकाणी मूर्ती खरेदीसाठी भाविकांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. हिंदी सिटी शाळेपासून जयंत टॉकीज मार्गापर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. सायंकाळी ७ वाजेपर्यंत गणेश मूर्तीची खरेदी करण्यासाठी हिंदी सीटी हायस्कूलच्या मागे चंद्रपुरातील गणेशभक्तांची गर्दी कायम होती.‘बाप्पा’चा जयघोषभक्तांनी लाडक्या बाप्पाला चारचाकी वाहन व ऑटोरिक्षातून घरी नेले. काहींनी दुचाकीवर मागे बसणाऱ्यांच्या हातात मूर्ती ठेवून उत्साहात बाप्पाला घरी नेताना दिसले. हिंदी सीटी शाळा ते रघुवंशी कॉम्प्लेक्सदरम्यानच्या मार्गावर दिवसभर प्रचंड गर्दी झाली होती. ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यकर्तेही वाहने घेऊन मूर्ती विकत घेण्यासाठी या परिसरात आले होते. मात्र यावेळी वाजेगाजे नव्हते. होता तो फक्त ‘गणपती बाप्पा मोरया’ चा जयघोष.सार्वजनिक गणेश मंडळांचीही तयारी जोरातयंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असले तरी गणेशभक्तांमध्ये शनिवारी उत्साह दिसून येत होता. सार्वजनिक गणेश मंडळेही चंद्रपुरात ठिकठिकाणी मंडप डेकोरेशनच्या कामात व्यस्त होती. गणेशभक्तांमध्ये व सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये उत्साह असला तरी कोरोना संसर्गाला विसरून चालणार नाही. कोरोना नियमांचे पालन करण्याची जबाबदारी दोघांवरही असणार आहे.मूर्तींच्या किमतीत वाढयंदा गणेश मूर्ती बनविण्यासाठी लागणाºया विविध साहित्याच्या किंमती वाढल्या. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मूर्तींच्या किंमतीमध्ये थोडी वाढ झाली. सरकारने पीओपी मूर्तीवर बंदी घातली. त्यामुळे मातीच्या मूर्ती विकत घेण्याशिवाय गणेश भक्तांना पर्याय उरला नाही. सजावटीसाठी पीओपीच्या वस्तु विकत न घेण्याची मानसिकता तयार होऊ लागल्याने कागदी वस्तुंकडे बहुतांश भक्तांचा कल दिसून आला. सायंकाळनंतर मात्र मूर्तीकारांना मूर्तीच्या किमती कमी केल्या.
कोरोनाचे विघ्न दूर कर बाप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 5:00 AM
गणेशोत्सव हा एक सार्वजनिक उत्सव आहे. समाजामध्ये एकता असावी, उद्देशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आगमन झाले. कोरोनाचे विघ्न असले तरी विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापणा गरजेचीच. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून मूर्तीकार मूर्ती घडविण्यात मग्न होते.
ठळक मुद्देभक्तीभावाने श्रीची प्रतिष्ठापणा । कोरोना काळातही उसळली गर्दी