लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : वाढत्या अतिक्रमणाने वरोरा शहराचा चेहरा मागील काही वर्षापासून दिवसागणिक विद्रुप होत होता. त्यामुळे वरोरा शहरवासीयांना आलेल्या पाहुण्यांकडून वाढत्या अतिक्रणाचे टोमणे खावे लागत असल्याने अतिक्रमणाने शहरवासीय त्रस्त झाले होते. अखेरीस वरोरा पालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. तीन दिवस चाललेल्या या अतिक्रमण हटाव मोहिमेतून शहरातील रस्ते व नाल्या मोकळ्या करण्यात आले असून या साफसफाईने तुर्तास वरोरा शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे.वरोरा शहरातील कुठलाही रस्ता अतिक्रमणाशिवाय उरला नव्हता. शहरातील रस्त्यालगत अतिक्रमण वाढून दिवसागणिक रस्ते अरुंद होत असल्याने शहरातील रस्त्यावर किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले. वाहन ठेवल्यानंतर धक्का लागल्यास बाचाबाची व हाणामारीच्या घटनाही घडत होत्या.नागपूर नाका चौकात अतिक्रमणाचा फटका काही वर्षापूर्वी एका उच्च अधिकाºयाच्या वाहनाला बसला होता. याच अतिक्रमण धारकाने त्या अधिकाºयासोबत बाचाबाची केली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्या अतिक्रमण धारकावर कारवाई केली होती. शहरातील रस्त्याच्या कडेला लोखंडी ठेले लावून सिमेंट काँक्रीटने पक्के केले. त्यासमोर अगदी रस्त्यासमोर शेडही काढले जात होते.हा प्रकार शहरात दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढला होता. अशा बहुतांश ठेल्यातून अवैध धंदेही केले जात असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे वरोरा न.प. प्रशासन, महसूल, पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण हटाव मोहिमेची तयारी केली.नागरिकांना अतिक्रमण हटाव मोहिमेच्या काही दिवसापूर्वी वर्तमान पत्रातून जाहिरात व ध्वनी प्रेक्षकावरुन माहिती दिल्याने अनेक अतिक्रमण धारकांनी स्वयंस्फुर्तीने अतिक्रमण हटविले. मात्र ज्यांनी हटविले नाही त्या अतिक्रमणावर जेसीबी चालविण्यात आला.शहरातील अतिक्रमण हटविताना पथकाने नगराध्यक्षांच्याही अतिक्रणावर जेसीबी चालविल्याने अतिक्रमण हटविताना दुजाभाव केला नसल्याचे दिसून आले. अतिक्रमण हटविताना ट्रॅक्टरने तत्काळ मलबा उचलल्या जात असल्याने रस्ते रूंद झाल्याचे दिसून येत आहे.अतिक्रमण हटविण्यासाठी पथक नेमावेन.प.प्रशासनाने तीन दिवस अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवून रस्ते व नाल्या मोकळ्या केल्या. त्यावर परत पक्के अतिक्रमण होवू नये, याकरिता वरोरा न.प.ने एक गस्ती पथक कार्यान्वीत करून अतिक्रमणावर नजर ठेवणे गरजेचे आहे.उर्वरित अतिक्रमणही काढण्याची मागणीवरोरा शहरात अतिक्रमण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे की तीन दिवस मोहीम राबवूनही अतिक्रमण हटाव मोहीम शहरातील काही भागात पोहचू शकली नाही. त्या ठिकाणी ही अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा राबवावी, अशी अपेक्षा वरोरावासीय नागरिक करीत आहेत.शहरातील रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढण्यात आल्याने अनेक बेरोजगार झाले आहे. त्यांचे तलाव पाळीच्या जागेनजीक पूर्नवसन करण्यात येणार असून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी सकारात्मक चर्चा झाली आहे. यासोबतच झोडपपट्टीवासीयांना पंतप्रधान आवास योजना व रमाई योजनेंतर्गत घरकुल बांधण्याकरिता कायमस्वरूपी पट्टे देण्याकरिता प्रयत्न करणार.- एहेतेश्याम अली,नगराध्यक्ष, वरोरा.
वरोरा शहरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 11:46 PM
वाढत्या अतिक्रमणाने वरोरा शहराचा चेहरा मागील काही वर्षापासून दिवसागणिक विद्रुप होत होता. त्यामुळे वरोरा शहरवासीयांना आलेल्या पाहुण्यांकडून वाढत्या अतिक्रणाचे टोमणे खावे लागत असल्याने ....
ठळक मुद्देतीन दिवसांची कारवाई : अनेकांच्या अतिक्रमणावर चालला बुलडोजर