कार्यक्रमाला मूलचे नगराध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, मूल नगरपालिकेचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दुशांत साखरे, वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता कुपाल लांजे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल टहलियानी, अशोक येरमे, सावलीचे ठाणेदार सिरसाट, पोंभुर्णाचे ठाणेदार जोशी, उमरी पोतदारचे ठाणेदार कुकडे उपस्थित होते.
मूल पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या मूल, सावली, पाथरी, पोंभुर्णा, गोंडपिपरी आणि उमरी पोतदार पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळ, पोलीसपाटील, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आणि शांतता समिती सदस्यांना गणेश उत्सव आणि इतरही सण कशा पद्धतीने साजरे करता येईल त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन यावेळी मान्यवरांनी केले. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहनही यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मूलचे ठाणेदार सतीशसिंह राजपूत यांनी केले. संचालन संजय पडोळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गोंडपिपरीचे ठाणेदार जेवन राजगुरू यांनी मानले. यावेळी मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.