चंद्रपूर : भाजपतर्फे पंतप्रधान नरेंद मोदी यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असताना, चंद्रपूर येथे युवक काॅंग्रेसने मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काॅंग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष हरिश कोत्तावार यांच्या नेतृत्वात ड्रिगी बेचो आंदोलन करण्यात आले. एक रुपयात डिग्री घ्या, डिग्री अशा घोषणा देण्यात आल्या. ड्रिगी विकून आलेल्या पैशातून पंतप्रधान मोंदीना वाढदिवसाची भेटही पाठविण्यात येणार आहे.
दरवर्षी दोन करोड रोजगार देण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. मात्र, केंद्रात त्यांची सत्ता आल्यापासून मागील काही वर्षांत अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेक उच्चशिक्षितांच्या पदव्या घरी पडून आहेत. त्यामुळे युवक काॅंग्रेसने १ रुपयात ड्रिगी विकून त्यातून पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त भेट पाठविण्यासाठी अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात युवक काॅंग्रेसच्या प्रदेश महासचिव शिवानी वडेट्टीवार, काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहराध्यक्ष रामू तिवारी, प्रदेश सचिव शिवा राव, जिल्हा प्रभारी मो. इरशाद शेख, माजी अध्यक्ष नंदू नागरकर, सुनीता लोढीया, प्रदेश सचिव सचिन कत्याल, रुचित दवे, विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, संतोष लहामगे, अमजद अली, इंटक युथ जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, ट्रान्सपोर्ट जिल्हाध्यक्ष इरफान शेख, जिल्हा महासचिव रमीज शेख, हाजी इमरान खान, सुरज कन्नुर, कुणाल चहारे आदी सहभागी झाले होते.
कोट
पंतप्रधान मोदींनी दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र दिवसेंदिवस लोकांचा रोजगार हिरावत चालला आहे. मागील काही वर्षांत बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या ड्रिगी एक रुपयाला विकून त्यातून जमा झालेल्या रकमेतून त्यांच्यासाठी वाढदिवसाची भेट पाठविणार आहोत. जेणेकरुन ते बेरोजगारांच्या भावना समजून रोजगार देतील.
- शिवानी वडेट्टीवार, प्रदेश महासचिव, युवक काॅंग्रेस