आॅनलाईन लोकमतचंद्रपूर: आपल्या देशाला उदांत्त संस्कृती लाभली असून इथली सामाजिक मुल्येही चिरंतन आहेत. अनेक महापुरूषांच्या शौर्यातून ही भूमी पावन झाली आहे. त्यांच्या असामान्य कार्याचा वारसा जपतानाच या महापुरूषांच्या कार्यकर्तुत्वातून प्रेरणा घेत आजच्या या पिढीने त्यांच्या कायार्चा छोटासा अंश अंगी बाळगण्याचे प्रयत्न केले, तर या देशाचे महानत्व जगात सिध्द होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विधीतज्ज्ञ रविंद्र भागवत यांनी केले.स्थानिक कमल स्पोर्टींग क्लबच्या वतीने छोटूभाई पटेल हायस्कूल समोरील शिवाजी चौकात शिवजयंती महोत्सव व ‘मी जिजाऊ बोलतेय’ या व्याख्यान कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी अॅड. भागवत बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, भाजपा नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, प्रमोद कडू, राजेश मून, मनपा गटनेते वसंत देशमुख, राहुल सराफ, डॉ. एम.जे. खान, मोहन चौधरी, नगरसेवक राजेंद्र अडपेवार, सुभाष कासनगोट्टूवार, रवी आसवानी, संदीप आवारी, संजय कंचर्लावार, झोन सभापती आशा आबोजवार, मनपा सभापती अनुराधा हजारे, शितल कुळमेथे, संगिता खांडेकर, श्याम कनकम आदी उपस्थित होते.अॅड. भागवत पुढे म्हणाले, भारतीय समाज हा उत्सवप्रिय आहे. महापुरूषांची जयंती, पुण्यतिथी आपण साजरी करत असतो. ते उत्सव साजरे करण्यामागील मर्म शोधून अनुकरण केल्यास पुण्यतिथी सामाजिकदृष्ट्या उपकारक ठरतील असे ते म्हणाले. आपण छत्रपती शिवराय होणे शक्य नाही. परंतु, या अनुषंगाने हिमनगाचे टोक होण्याचा प्रयत्न युवकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी आ. नाना श्यामकुळे यांनी छत्रपती शिवरायांची किर्ती वैश्वीक पातळीवर सुर्वणाक्षराने नोंदल्या गेली असल्याचे प्रतिपादन केले.यावेळी ९ वर्षीय सानवी राहुल सराफ या बालीकेने शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडा सादर केला. त्यानंतर शिव महोत्सवात शिव चरित्राच्या अभ्यासक चैताली खटी यांनी ‘मी जिजाऊ बोलतोय’ या एकपात्री नाट्यप्रयोगातून शिवकालीन इतिहास साकार केला. संचालन रेवती बडकेलवार यांनी तर आभार कमल स्पोर्र्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघूवीर अहीर यांनी केले.या प्रसंगी मल्लखांबाचे प्रात्यक्षिकसुध्दा प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले. रघुवीर अहीर यांनी सत्कार केला. यावेळी श्यामल अहीर, महेश अहीर, विनय अहीर, कमल स्पोर्टींग क्लबचे मयुर झाडे, सतिश गौरकार, अभिनव लिंगोजवार, रवि बनकर, सुरज पेद्दुलवार, राहुल गायकवाड, विपीन मेंढे, जितेश वासेकर, शिवम त्रिवेदी, प्रज्वलंत कडू, कृपेश बडकेलवार, अक्षय खांडेकर, विक्की लाडसे आदी उपस्थित होते.छत्रपतींचे कार्य दिशादर्शक- अहीरछत्रपती शिवाजी महाराजांच्या देशभक्तीचा, निर्धमी राज्य कारभाराचा अविस्मरणीय वारसा जतन करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. सर्व धर्मीयांनी आदर राखावा, असे त्यांचे व्यक्तीत्व आहे. आमच्या मातीमध्ये हे संस्कार रूजले असल्याने महाराजांच्या जयंती सोहळ्यात सर्वधर्म समभावाचा अनुभव वर्षोनुवर्षे आम्ही घेत आहोत. शिवाजी महाराजांच्या कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे, असे मत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:51 PM
आपल्या देशाला उदांत्त संस्कृती लाभली असून इथली सामाजिक मुल्येही चिरंतन आहेत. अनेक महापुरूषांच्या शौर्यातून ही भूमी पावन झाली आहे.
ठळक मुद्देरवींद्र भागवत : चंद्रपूर येथे शिवजयंती महोत्सव, नागरिकांची उपस्थिती