चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यू व मलेरियाने डोके वर काढले आहे. मात्र मनपाकडून केवळ थातूरमातूर फवारणी केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. परिणामी डेंग्यू व मलेरियाला प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना कराव्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मनपा आयुक्ताना दिलेल्या निवेदनातून केली आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताच जिल्ह्यात डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहे. डेंग्यूने काही जणांचा मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोनाकाळात स्वच्छतेची गरज असताना मनपाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी डासांचा प्रकोप वाढत आहे. त्यामुळे फॉगिंग मशीनद्वारे फवारणी करावी, अशी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष तनुजा रायपुरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी शहर सचिव मोनाली पाटील, उपाध्यक्ष सुलभा चांदेकर, छाया थोरात, अनिता जोगे, सचिव पौर्णिमा जुनघरे, सुविधा बांबोळे, प्रेमीला बेडले, वॉड शाखा अध्यक्ष मंजुषा निरंजने, पुजा धोटे, ज्योती जीवने, शिल्पा शेंडे, अंजू देवगडे, ललिता शेळके, सुजाता ढोरे आदी उपस्थित होते.
डेंग्यू, मलेरियाबाबत उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:25 AM