लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूूर : अधिक नफा कमविण्याच्या नादात नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार पदार्थ विक्रेत्यांकडून सुरु आहे. अनेकांकडे परवाना नसतानाही उघड्यावर पदार्थांची विक्री सुरु आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने उघड्यावरील पदार्थांसोबत आजारही फ्री मिळत आहे.अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार अन्न पदार्थ विक्रेत्यांपासून तर किरकोळ विक्रेत्यांपर्यंत प्रत्येकांकडे नोंदणी प्रमाणपत्र किंवा अन्न परवाना असणे आवश्यक आहे. मात्र, शहरातील प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशनकडून अन्न सुरक्षा कायद्याचे सर्रास उलंघन होत आहे. नफेखोरीतून विक्रेते अनोंदणीकृत गोळ्या, औषधे व पदार्थांची सर्रास विक्री करित आहेत.५ जानेवारी २०११ पासून अन्न सुुरक्षा व मानदे कायदा लागू करण्यात आला. पदार्थ उत्पादन करणाऱ्या संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र किंवा परवाना बंधनकारक आहे. या कायद्या अंतर्गत पदार्थांची विक्री अन्न परवानाधारक संस्थामार्फत होणे आवश्यक आहे. मात्र, अनेकांकडे नोंदणी प्रमाणपत्र नसतानाही पदार्थांची विक्री केली जात आहे. त्यामुळे पदार्थांत भेसळीचे प्रकार घडत आहेत.अन्न सुरक्षा कायद्यानुसार औषध व पदार्थ विक्रीचे निकष ठरवून देण्यात आले आहे. हॉटेलमधील ग्राहकांसाठी व्यवस्था, पदार्थ तयार करण्याचे निकष आहेत. मात्र, अनेक ठिकाणी अशी व्यवस्था दिसून येत नाही. अस्वच्छता अनेक हॉटेलात दिसून येते. शहरातील पदार्थ विक्रीच्या दुकानाची तपासणी नियमीत होत नाही. तर ग्रामीण भाग व मुख्य मार्गावर असलेल्या हॉटेल, धाब्यांचीही तपासणी होत नाही. झालीच तर आधीच विक्रेत्यांना माहिती मिळत असते. त्यामुळे अधिकारी पोहल्यावर सर्व ‘आॅल इज वेल’ आढळून येते. त्यामुळे अधिकाऱ्यांची कोणतीही भिती न बाळगता धाबे चालक अन्न सुरक्षा कायद्याचे सर्रास उलंघन करित आहेत.सुगंधित तंबाखूच्या विक्रीकडे दुर्लक्षशासनाने सुगंधीत व गुटखाजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, बंदीची अंमलबजावणी करणारे अधिकारीच कारवाई करण्यास निरुत्साही दिसून येतात. शहरात खुलेआम सुगंधीत पदार्थाची विक्री होत आहे. हे नागरिकांना दिसत असले तरी अधिकाºयांना दिसत नसावे तर नवलच. कारवाई करण्याचा अधिकार असूनही अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी थेट जाऊन कारवाई करु शकत नाही. त्यामुळे पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करता येऊ शकते. परंतु, तसे पाऊल उचलले जाणे गरजेचे आहे.
उघड्यावरील पदार्थांसोबत घ्या आजारही फ्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:45 AM
अधिक नफा कमविण्याच्या नादात नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार पदार्थ विक्रेत्यांकडून सुरु आहे. अनेकांकडे परवाना नसतानाही उघड्यावर पदार्थांची विक्री सुरु आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याने उघड्यावरील पदार्थांसोबत आजारही फ्री मिळत आहे.
ठळक मुद्दे नागरिकांचे आरोग्य धोक्यात : अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष