लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रात घेण्यात येत असलेल्या या रोगनिदान महामेळाव्यातील गंभीर रूग्णांचा उपचार पूर्ण करण्याचे दायित्व घेतले जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.चांदा क्लब ग्राऊंडवर दोन दिवसीय रोगनिदान, उपचार व आरोग्य प्रदर्शन महामेळाव्याला गुरुवारी सुरूवात झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपसंचालक (आरोग्य सेवा) डॉ. संजय जयस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, आय. एम. ए. अध्यक्ष डॉ. प्रमोद राऊत, आय.ए.पी. संघटनेचे अध्यक्ष डॉ. एम. जे. खान, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. बी. राठोड, जिल्हा आरोग्यअधिकारी डॉ. प्रकाश साठे, सभापती ब्रिजभूषण पाझारे, अर्चना जीवतोडे, स्थायी समिती सभापती राहुल पावडे मंचावर उपस्थित होते.ना. अहीर यांनी महामेळाव्यात आलेल्या प्रत्येक रूग्णांची तपासणी व रोग निदान होईल. यासोबतच गंभीर आजार व शस्त्रक्रिया असल्यास अशा रुग्णाचेसुध्दा आयुषमान भारत योजनेंतर्गत मेडीकल कॉलेजमार्फत उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा केली. आयुषमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना सी.एस.सी सेंटर मार्फत गावागावात गोल्डन ई-कार्ड वाटप करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. यावेळी सिकलसेल रूग्णांना दिव्यांग सर्टिफिकेट देण्यात आले व आयुषमान योजनेतील लाभार्थ्यांना गोल्डन ई-कार्ड वाटप करण्यात आले व अपंगांना बॅटरीवर चालणारी ट्रायसिकल व पेट्रोलवर चालणारी आॅटो ट्रायसिकल देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ना. हंसराज अहीर यांचे जिल्ह्यात राबविण्यात येणाºया प्रत्येक उपक्रमावर व लहान बाबींवर बारकाईने लक्ष असते, असे सांगितले. गोवर व रूबेला या लसीकरणासाठी चंद्रपूर जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थान प्राप्त झाले. जिल्हा स्तरावर वैद्यकीय अधिकाºयांची पदे भरणे सुरू झाले असून भावी डॉक्टरांनी नोकरीकडे न बघता लोकसेवा करावी, असेसुध्दा ते म्हणाले. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन नासीर खान व सोनाली गायकी यांनी केले.महामेळाव्यातील दालनेदोन दिवसीय महामेळाव्याकरिता विशेष तज्ज्ञ डॉक्टरांचे दालन उभारण्यात आले आहे. त्यासोबतच विविध रोगांवरील उपचाराकरिता येणाºया रूग्णांसाठी स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये कक्ष क्रमांक १ ते ३७ असे कक्ष उभारण्यात आले आहे. त्यामध्ये चिकीत्सक कक्ष, हदयरोग तज्ज्ञ कक्ष, बालरोग तज्ज्ञ कक्ष, बालशल्य चिकित्सक, स्त्रीरोग तज्ज्ञ, शल्य चिकित्सक, कान, नाक घसा तज्ज्ञ, अस्थीरोग तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, दंत चिकित्सक, मनोविकार तज्ज्ञ, मेंदुरोग तज्ज्ञ, मुत्रविकार तज्ज्ञ, मुत्रपिंड तज्ज्ञ, मुखशल्य चिकित्सा, त्वचा विकार, आयुर्वेद योग निसर्गोपचार, होमिओपॅथी चिकित्सा, युनानी चिकित्सा असे कक्ष तयार करण्यात आले आहेत. त्यासोबतच जिल्हा अवयवदान समिती, आयुषमान भारत योजना, सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम, दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्र, राष्ट्रीय तंबाकू नियंत्रण कार्यक्रम, हत्तीरोग विभाग, किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आणि कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम यांचे सुध्दा दालन या महामेळाव्यात उभारण्यात आले आहे.
गंभीर रूग्णांच्या संपूर्ण उपचारासाठी दायित्व घेऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:15 AM
चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रात घेण्यात येत असलेल्या या रोगनिदान महामेळाव्यातील गंभीर रूग्णांचा उपचार पूर्ण करण्याचे दायित्व घेतले जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली.
ठळक मुद्देहंसराज अहीर : रोगनिदान महामेळाव्याला प्रारंभ