शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
3
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
4
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
5
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
6
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
7
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
8
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
9
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
10
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
11
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
12
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
13
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
14
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
15
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
16
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
17
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
18
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
19
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
20
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?

१५ दिवसांत सुरक्षा रक्षकांना कामावर घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:34 AM

शिवसेनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाºयानंतर वेकोलि प्रबंधनाने सर्व सुरक्षा रक्षकांना पूर्ववत कामावर घेण्याचे आश्वासन दिले होते...

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : शिवसेनेचे धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शिवसेनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाºयानंतर वेकोलि प्रबंधनाने सर्व सुरक्षा रक्षकांना पूर्ववत कामावर घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शब्द न पाळता वेकोलिने कामगारांचा विश्वासघात केला. वेकोलि प्रबंधकाची ही मुजोरी आता खपवून घेतली जाणार नाही. येत्या १५ दिवसाच्या आत सर्व सुरक्षा रक्षकांना कामागावर घ्यावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी वेकोलि प्रबंधनाची राहील, असा इशारा शिवसेना विधानसभा प्रमुख किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.वेकोलिमध्ये कार्यरत सुरक्षा रक्षकांना पूर्ववत कामावर घ्या, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात सुरक्षा रक्षकांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात ते बोलत होते. ते म्हणाले, कोणतीही पूर्व सूचना न देता जुलै महिन्यात वेकोलि प्रबंधकाने जिल्ह्यातील १ हजार ते १२०० स्थानिक खासगी सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढले. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबावार मोठे संकट कोसळले आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनसुद्धा वेकोलि प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही.निवेदनाची भाषा वेकोलि प्रशासनाला समजत नसेल तर शिवसेनेच्या भाषेत उत्तर द्यायची आमची पूर्ण तयारी आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या बाबतीत घेतलेला अन्यायकारक निर्णय वेकोलिने तत्काळ रद्द करावा आणि सर्व कामगारांना पूर्ववत कामावर रूजू करून घेत न्याय द्यावा. ही सर्व प्रक्रिया येत्या १५ दिवसाच्या आत करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, किशोर जोरगेवार यांनी दिला आहे. या आंदोलनात नगरसेवक विशाल निंबाळकर, संगीता बोबडे, सायली येरणे, माया पटले, दुर्गा वैरागडे, सुजाता बल्ली, विद्या निब्रड, शांता धांडे, विजया बचाव, मुन्ना लोढे, बाळू चिकनकर, इमरान खान, स्वप्नील वाढई, विनोद अनंतवार, विलास बनकर, हर्षद कानमपल्लीवार, अशोक खडके, विनोद गरडवा, इशाक अली, सोनाल भगत आदींचा सहभाग होता.