लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अहमदनगर येथील १० वर्षीय बालिकेला चाकूचा धाक दाखवून अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा पद्मशाली समाज संघटना व पद्मशाली समाज चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकाºयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.अहमदनगर शहरातील तोफखाना भागातील १० वर्षीय चिमुकलीवर त्याच परिसरात राहणारा आरोपी अफसर लतीफ सय्यद याने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अमानुष अत्याचार केला. याबाबतची तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्या आरोपीसह असणाºयांना त्वरीत अटक करावी, आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, सदर खटला जलदगती न्यायालयात चालवावा, नामांकित वकिलाची नियुक्ती करावी, कुटुंबीयांना शासनाने २५ लाखांची मदत करावी, पीडित मुलीचा शिक्षणाचा खर्च व भविष्यात तिला शासकीय नोकरी द्यावी, वैद्यकीय मदत देऊन कुटुंबीयांना संरक्षण द्यावे, अशी मागणी पद्मशाली सामाजातर्फे करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. निवेदन देणाºया शिष्टमंडळात जिल्हा अध्यक्ष विनोेद कुडकेलवार, एसबीसी संघर्ष समितीचे कार्यवाहक चंद्रकांत हाट्टे, सहसचिव विलास सोमलवार, कोषाध्यक्ष संतोष वासलवार, पद्मशाली समाजाचे अध्यक्ष चंद्रशेखर अल्लेवार, सुर्यकांत कुचनवार, विलास कुंटेवार, मधुकर चिप्पावार, रामदास आईटलावार आदी उपस्थित होते.
‘त्या’ आरोपींवर कठोर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:35 PM
अहमदनगर येथील १० वर्षीय बालिकेला चाकूचा धाक दाखवून अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा पद्मशाली समाज संघटना व पद्मशाली समाज चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकाºयामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
ठळक मुद्देपद्मशाली समाजाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन