नंदू नागकर: शहर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा चंद्रपूर: अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार करणाऱ्या नराधामाविरोधात योग्य कारवाई करणे व खासगी रुग्णालयात व्हीआयपी ट्रीट्रमेंट देण्याबाबत चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीने चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहर काँग्रेस अध्यक्ष नंदू नागरकर यांनी दिला. अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार करणारा आरोपी अनिरुद्ध चकनारपवार याला अटक केल्यावर २१ जुलै २०१६ पर्यंत पोलीस कोठडीत रवाणगी जिल्हा न्यायालयाने केली. मात्र शनिवारी रात्री १०.३० वा. आरोपीने रामनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्यावर त्याला सर्वप्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील चंद्रपूर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागपूरला मेडीकल कॉलेजमध्ये हलविण्याकरिता लेखीपत्र दिल्यानंतर पोलीसांनी आरोपीच्या नातेवाईकाच्या खासगी रुग्णालय श्वेता हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यासाऱ्या प्रकारामुळे पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाले आहे. जनतेमध्ये आक्रोश वाढत चालला आहे. जनतेसमोर सत्य आणण्यासाठी व आरोपीची पाश्वभूमी ही गुंढप्रवृत्तीची आहे. त्याच्या मेडीकल स्टोअर्समध्ये नशेचे गोळ्या व अफीम, गांजा, दारु मादक पदार्थ विक्री करणाऱ्या नराधामाबद्दल आपल्याकडे तक्रार करणाऱ्या लोकांना आपण ज्याप्रकारे सहानभूती पूर्वक सांगतो, ही बाब अशोभनीय आहे, असे चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटी व जनतेला वाटते. आरोपीने ज्या मुलीचे शोषण केलेले आहे. जर आपण सखोल चौकशी केली असता अन्य अनेक प्रकरणे समोर आले असते. आरोपीचे राजकीय संबंध लक्षात घेवून त्यावर होत असलेल्या कार्यवाहीबद्दल जनसामान्यातून आक्रोश निर्माण होत आहे. फक्त शिपायाला निलंबित करुन चालणार नाही तर नागपूर मेडीकलचे पत्र असताना कोणत्या अधिकाऱ्यांनी दिरंगाईत केली त्याच्या भावाच्या व नातेवाईकाच्या सांगण्यावरुन कोणत्या अधिकाऱ्यानी खटाटोप केलेला आहे, त्या अधिकाऱ्यांच्या फोन आयटी तपासून त्यांच्यावर कार्यवाही करावी. सदर आरोपी व त्याच्या भावाची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर आताच सखोल तपास करुन कार्यवाही न केल्यास भविष्यात त्यांची मगुरी वाढेल व समाजात विपरीत परिणाम होईल. जनता कॉलेज परिसर आरोपीच्या भावामुळे, दहशतीमुळे हादरुन गेले आहे. याची आपण नोंद घ्यावी अशी मागणीही नागरकर यांनी केली. यावेळी काँग्रेस मागास वर्गीय विभागाचे प्रदेश महासचिव संजय रत्नपारखी, असंघटित कामगार विभाग जिल्हाध्यक्ष विनोद संकत, असंघटित कामगार विभाग शहराध्यक्ष अनिल सुरपाम, केशव रामटेके, सुलेमान अली, रेहान शेख, गोर पाटील, रणधीर शंभरकर, मुकुंद भानारकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)
अपहरण-बलात्कारप्रकरणी कठोर कारवाई करा
By admin | Published: July 22, 2016 1:08 AM