मोरेश्वर टेमुर्डे : डी.के. आरीकर यांचा नागरी सत्कारचंद्रपूर : सामाजिक कार्यकर्त्यांनी फुले-शाहु-आंबेडकर यांच्या विचारांचा अमल करावा. आज प्रतिगामी विचारांना उधाण आले आहे. त्यामुळे त्याचा प्रखर विरोध करणारे आणि फुले- शाहु आंबेडकरांच्या विचारांवर प्रखर निष्ठा असणाऱ्या डी.के.आरीकर सारख्या कार्यकर्त्यांची समाजाला गरज आणि महत्त्व आहे. म्हणूनच त्यांचा नागरी सत्कार होत आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी केले. ते येथे मंगळवारी आयोजित डी.के. आरीकर यांच्या षष्टब्दीपूर्ती सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. त्यांनी आरीकर यांना शुभेच्छा देवून कार्यकर्त्यांना आरीकर यांच्यापासून प्रेरणा घेवून समाजकार्य करण्याचे आवाहन केले.तत्पूर्वी डी.के. आरीकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रंजना आरीकर यांचा अॅड. मोरेश्वर टेमुर्डे आणि प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या हस्ते शाल, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि मानवस्त्र देवून सत्कार करण्यात आला. डी.के. आरीकर गौरव विशेषांकाचे प्रकाशनसुद्धा करण्यात आले. सत्कार समारंभाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध साहित्यीक प्रा. ज्ञानेश वाकुडकर उपस्थित होते.याप्रसंगी किशोर पोतनवार, प्रा. बळवंत भोयर, अॅड. भगवान पाटील, हिराचंद बोरकुटे, राजेंद्र वैद्य, वैदेही रोहणकर यांनीही आपले विचार मांडले. डी.के. आरीकर यांनी सत्काराला उत्तर देताना आपण फुले- शाहु- आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असून त्यांच्या विचारांपासून आपल्याला ताकद मिळते. त्यामुळे आपण निर्भयपणे समाजकार्य, पत्रकारिता करीत आलो आहे, असे सांगितले.यावेळी मंचार प्रसिद्धी साहित्यीक ना.गो. थुटे, सुभाष गौर, तुकाराम पवार, प्रदीप वादाफळे, नीळकंठ भोयर, कुुक्कू साहनी, विनायक शिवणकर, खैरे कुणबी समाजाचे अध्यक्ष गुणेश्वर आरीकर, पांडूरंग ठाकरे, अनिल वाघमारे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
महापुरुषांचे विचार अंमलात आणा
By admin | Published: November 17, 2016 1:52 AM