लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाघ नखापासून गळ्यात लॉकेट बनविण्यासाठी येथील एका सुवर्णकाराकडे आलेल्या ग्रामसेवकाला वन अधिकाऱ्यांनी सोमवारी अटक केली. अटकेतील आरोपीचे नाव संजय माधव कुंटावार असे आहे. तो गडचिरोली पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे. न्यायालयाने दोन दिवसांची वनकोठडी सुनावल्यानंतर जामिनावर सुटका केली. या वाघाच्या तस्करीचे धागेदोरे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात असल्याने वनविभाग त्या दिशेने चौकशी सुरू केली आहे.आरोपी ग्रामसेवक संजय कुंटावार याचे मूल शहरात वास्तव्य आहे. २००५ मध्ये तो गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील बिनागुंडा येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत होता. त्यावेळी त्याने एका व्यक्तीला घरकुल मिळून देण्याचे आमीष देऊन एका व्यक्तीकडून वाघनखे मिळविली. सोमवारी वाघनखापासून लॉकेट बनविण्यासाठी मूल येथील क्रिष्णकांत विठ्ठल कत्रोजवार या सुवर्णकाराच्या दुकानात गेला असता ही माहिती एका वन्यजीव प्रेमी व्यक्तीला मिळाली. त्याने लगेच वनविभागाला कळविले असता वनपाल खनके व वनरक्षक मरसकोल्हे यांनी ग्रामसेवक कुंटावार याला ताब्यात घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय चिचपल्ली येथे नेण्यात आले. अधिक चौकशी केली असता त्याने वाघ नखाच्या तस्करीची माहिती दिली असता वनविभागाने वनकायदा अन्वये कलम ३९,५१अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांच्या वनकोठडीनंतर न्यायालयात हजर केले असता जामिनावर सुटका झाली. पुढील तपास सहाय्यक वनसरक्षक एस. एल. लखमावाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव राजूरकर करीत आहेत.
वाघनखे घेऊन 'तो' लॉकेट बनविण्यासाठी गेला आणि जाळ्यात अडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 10:17 PM
वाघ नखापासून गळ्यात लॉकेट बनविण्यासाठी येथील एका सुवर्णकाराकडे आलेल्या ग्रामसेवकाला वन अधिकाऱ्यांनी सोमवारी अटक केली.
ठळक मुद्देमूल येथील घटनावन विभागाची कारवाई