मासळ बु : चिमूर तालुक्यातील मासळ बु. येथे उपविभागीय अधिकारी यांच्या सकल्पनेतून लोकवर्गणीतून सुसज्ज तलाठी कार्यालयाचा निर्मिती करण्यात आले. लोकसहभागातून एखादे शासकीय कार्यालय बनण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या लोकसहभागतील कार्यालयतले अमोल घाटे हे पहिले तलाठी आहेत. उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या दालनात झालेल्या सभेत लोकसहभागातून तलाठी कार्यालयांची निर्मिती ही संकल्पना मांडली होती. त्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करुन तलाठी .सा. क्र.९ चे तलाठी अमोल घाटे यांनी मासळ बु येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पडक्या इमारतीची लोकसहभागातून डागडुजी करून नव्याने तलाठी.सा.९ येथे सुसज्ज अशा कार्यालयाची निर्मिती करण्यात अमोल घाटे हे तालुक्यातील पहिले तलाठी ठरते, तलाठी कार्यालयाची निर्मिती झाल्याने नागरिकांना तलाठी यांची प्रत्यक्षात भेटी होणार आहे. यामुळे नागरिकांची पायपीट थांबणार असल्याने मासळ बु परिसरात आनंदाचे वातावरण दिसून आले.