लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी : तीन वर्षांपूर्वी तळोधी (बा.) पोलीस स्टेशनची स्थापना झाली. पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी जागाही निश्चित करण्यात आली. मात्र अद्यापही बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे आजही येथील कारभार किरायाच्या जीर्ण इमारतीमधून चालत आहे. परिणामी केव्हावी धोका होण्याची शक्यता आहे.तळोधी (बा.) पोलीस स्टेशनची स्थापना २५ जानेवारी २०१६ रोजी झाली. तळोधी (बा) पोलीस स्टेशनच्या मालकीच्या भुमापन क्रमांक ६६ असलेल्या ५ एकर जागेत वर्षभरात तळोधी (बा) पोलीस स्टेशनची ईमारतीचे बांधकाम करण्याचा आश्वासन पोलीस स्टेशन लोकापर्णाच्या दिवशी देण्यात आला. परंतु अद्यापही बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही. तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत ४२ गावे येतात. या ठाण्यात एक ठाणेदार, एक पोलीस उपनिरिक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरिक्षक, १२ हवालदार, १० नायब पोलीस शिपाई १५ पोलीस शिपाई, सहा डब्ल्यू. पी. सी. पोलीस कर्मचारी भाड्याच्या जीर्ण इमारतीत कर्तव्यावर आहेत. अनेकदा नव्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्याची मागणी होऊनही दुर्लक्ष होत आहे.अपुऱ्या जागेअभावी अडचणतळोधीपासून नागपूर जवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दारुची वाहतूक होते. त्यामुळे अनेक दारुच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र जागेअभावी जप्त केलेली वाहने ठेवण्यास मोठी अडचण जात आहे. त्यासोबत ठाण्यामध्ये लॉकरची सुविधा नसल्याने अडचण जाते. तसेच पोलीस स्टेशनमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने भर उन्हात पाण्यासाठी बाहेर जावे लागते. त्यामुळे लवकर इमारत बांधकामाला सुरुवात करावी, अशी मागणी आहे.
तळोधी ठाणे किरायाच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:47 AM
तीन वर्षांपूर्वी तळोधी (बा.) पोलीस स्टेशनची स्थापना झाली. पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी जागाही निश्चित करण्यात आली. मात्र अद्यापही बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे आजही येथील कारभार किरायाच्या जीर्ण इमारतीमधून चालत आहे.
ठळक मुद्देअडचणींचा सामना : जीर्ण इमारतीतून चालतो कारभार