प्रथम पुरस्कार भारत विद्यालयातील दहावीचा विद्यार्थी उमेश केशव गहाणे , द्वितीय अंतरराळवीर कल्पना चावला पुरस्कार सर्वोदय ज्युनिअर काॅलेजची बारावीचीसरोज संतोष लोखंडे व तृतिय अल्बर्ट आइन्स्टाइन पुरस्कार प्राजक्ता विद्यामंदिर यत्ता नववीचा हरीश ओमप्रकाश बोरकर यांनी पटकाविला आहे. या तालुकास्तरीय ऑनलाईन परिक्षेत बहुपर्यायी व वस्ठुनिष्ठ प्रश्न विचारण्यात आले होते. दहा शाळा -महाविद्यालयातील ५० स्पर्धक सहभागी झाले होते .
सर्व विजेत्यांचे शाळांचे मूख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, माध्यमिक शिक्षणाधिकारी उल्हास नरड, डायटचे प्राचार्य धनंजय चाफले, गटशिक्षणाधिकारी संजय पालवे व विषयतज्ञ प्रा .भारत मेश्राम आदींनी कौतूक केले आहे . विजेत्या स्पर्धकांना एका कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे..