भोजराज गोवर्धन ।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : राज्य शासनाने गावागावात शांततेतून समृध्दी नांदावी म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहीम राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. सामाजिक किनार लाभलेल्या या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला चांगलीच गती मिळाली आहे.मूल पोलीस स्टेशन अंतर्गत मूल तालुक्यातील ५० गावात तंटामुक्त समिती कार्यरत आहेत. सन २००७-०८ मध्ये तालुक्यात तीन गावे तंटामुक्त झाली. यामध्ये राजगड, मरेगाव आणि कांतापेठ या गावांचा समावेश आहे. २००८-०९ मध्ये चंद्रपूर तालुक्यातील मात्र मूल पोलीस स्टेशनला जोडलेली दोन गावे तंटामुक्त झाली. यामध्ये नागाळा आणि गोंडसावरी या गावांचा समावेश आहे. २००९-१० मध्ये तालुक्यातील तीन गावे तंटामुक्त झाली. यामध्ये काटवन, गांगलवाडी आणि खालवसपेठ या गावांचा समावेश आहे. २०१०-११ मध्ये या मोहिमेमध्ये दोन गावांना यश आले व तंटामुक्त गाव म्हणून घोषित झाले. यात भादुर्णा आणि चिमढा या गावांचा समावेश होता. २०११-१२ मध्ये मूल तालुक्यातील तीन तर पोंभुर्णा तालुक्यातील दोन गावे तंटामुक्त झाली. यामध्ये मूल तालुक्यातील बेंबाळ, पिपरी दीक्षित, चिखली तर पोंभुर्णा तालुक्यातील पिपरी देशपांडे आणि दिघोरी या गावांचा समावेश आहे. २०१२-१३ मध्ये मारोडा आणि डोंगरगाव ही दोन गावे तंटामुक्त झाली. २०१३-१४ मध्ये आकापूर, टेकाडी, मोरवाही आणि देवाडा भुज. ही गांवे तंटामुक्त झाली. २०१४-१५ मध्ये बोरचांदली, फिस्कुटी, जानाळा आणि गडीसुर्ला ही गांवे तंटामुक्त झाली.पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या अनेक गावांना तत्कालीन पोलीस निरीक्षकांच्या पुढाकारातुन तंटामुक्त पुरस्कार मिळाला. त्या पुरस्काराच्या रकमेतून अनेक गावात विकासात्मक कामे करता आली. सन २०१५-१६ नंतर अनेक गावातील तंटामुक्त समिती पदाधिकारी तंटामुक्त पुरस्कारासाठी पाहिजे त्याप्रमाणावर लक्ष देत नाही. परंतु पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार हे यासाठी कार्यरत आहेत.
मूल तालुक्यात तंटामुक्ती अभियान यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 10:09 PM
राज्य शासनाने गावागावात शांततेतून समृध्दी नांदावी म्हणून महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहीम राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. सामाजिक किनार लाभलेल्या या निर्णयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला चांगलीच गती मिळाली आहे.
ठळक मुद्देगावागावात प्रबोधन : अनेक गावे झाली तंटामुक्त