चंद्रपूर : कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक हे त्यांनी केलेल्या कर्तव्याचा आरसा असतो. मात्र अनेकवेळा सेवापुस्तक अद्ययावतच रहात नसल्याने सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. चंद्रपूर जिल्हा परिषदेतही अशी अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. त्यामुळे
हा प्रकार टाळण्यासाठी प्रत्येक गटशिक्षणाधिकाऱ्यांनी क्रमवारीनुसार महिन्याला १० सेवापुस्तकांच्या नोंदी तपासून पाठविण्याचे आदेश सीईओंनी दिले आहे. त्यामुळे लाभापासून वंचित असलेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये काही आजी तसेच माजी शिक्षकांचे सेवापुस्तक अद्ययावत नाही. परिणामी वेतन, तसेच इतर लाभ सेवानिवृत्तीनंतरही अनेक महिन्यांपर्यंत मिळत नाही. त्यातच सेवानिवृत्त झाल्यानंतर काही अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. परिणामी हक्काचा पैसा त्यांना वेळेत मिळत नाही. प्रत्येक कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत व्हावे, यामध्ये सुसूत्रता यावी तसेच कर्मचाऱ्यांना त्यांचा लाभ योग्य वेळेत मिळावा यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी मिताली सेठी यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना प्रत्येक महिन्याला दहा सेवापुस्तकांची सूचीनुसार तपासणी करून शिक्षण विभागाकडे पाठविण्याचे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे, महिन्याच्या १५ तारखेपर्यंत हे सेवापुस्तक सादर करावे लागणार आहे.
बाॅक्स
शिक्षण विभागालाही व्हावे लागेल दक्ष
गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रत्येक महिन्याला आलेले सेवापुस्तक तपासून
महिन्याच्या २५ तारखेपर्यंत वित्तविभागाकडे पाठवावे लागणार आहे. त्यानंतर शिक्षण विभागाकडून टप्याटप्प्याने प्राप्त होणाऱ्या सेवापुस्तकातील वेतन पडताळणी पूर्ण करून पुन्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविणार आहे. विशेष म्हणजे, निपटारा झालेल्या प्रकरणाची यादी प्रत्येक पंचायत समिती स्तरावरील शिक्षण विभागाला प्रसिद्ध करावी लागणार आहे.
बाॅक्स
असा राहील प्राधान्यक्रम
मृत शिक्षक
लोकआयुक्त संदर्भ
सेवानिवृत्त झालेले शिक्षक
तीन महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणारे
सहा महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणारे
एका वर्षामध्ये सेवानिवृत्त होणारे
इतर वेतन निश्चिती प्रकरण.
बाॅक्स
सेवापुस्तकातील महत्त्वाच्या नोंदी कर्मचाऱ्याचे नाव
पदनाम
जन्मतारीख
सेवेत रुजू झाल्याचा दिनांक
सेवानिवृत्ती दिनांक
वर्गवारी, सर्वसाधारण, आरक्षण
बाॅक्स
इतर विभागही होणार अपडेट
जिल्हा परिषद शिक्षण विभागासह इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांतील नोंदी अद्ययावत करण्यात येणार आहे. विशेषत: दरवर्षी कर्मचाऱ्यांचे सीआरची नोंद घेणे गरजेचे असते. त्यामुळे टप्प्याटप्प्याने एक एक विभागातील सेवापुस्तक अद्ययावत करण्यात येणार आहे.
कोट
शिक्षण विभागासह इतरही विभागातील कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकातील नोंद अद्ययावत करण्यात येणार आहे. काही कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत नसल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांची नोंद घेतली जाणार आहे. यासाठी प्राधान्य क्रम ठरवून देण्यात आला आहे.
-मीताली सेठी
सीईओ, चंद्रपूर